सोलापूरमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निरोप समारंभ वेळी फंडाचा चेक द्या : बापूसाहेब सदाफुले

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील विभागीय क्रमांक 2 प्रभाग 1 कडील स्वच्छता दूत (सफाई कर्मचारी) भिकाजी कांबळे यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून सोलापूर महानगरपालिकेचे कर्तव्यदक्ष अधिकारी मुख्य लेखापाल राजरत्न जवळगेकर, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनचे अध्यक्ष बापूसाहेब सदाफुले, मुख्य आरोग्य निरीक्षक लोखंडे, आरोग्य निरीक्षक हिरोळी, आरती करडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून बुद्ध वंदना घेण्यात आली व भिकाजी कांबळे यांचा सहपत्नीक सत्कार करण्यात आला.

यावेळी ट्रेड युनियनचे अध्यक्ष बापूसाहेब सदाफुले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, प्रथमता मुख्य लेखापाल जवळगेकर यांचे अभिनंदन केले अनेक वर्षापासून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या देय थकीत रकमा सन 2023 ते 2024 पर्यंत सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या अदा केल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानले. व भिकाजी कांबळे हे कर्मचारी सोमपा मध्ये 32 वर्ष घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे प्रामाणिकपणे सोलापुरातील नागरिकांच्या आरोग्याची सेवा केली एवढी वर्ष सेवा करून सुद्धा सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला सोमपा प्रशासन कडून स्वतःच्या रकमेतून त्यांना आर्थिक स्वरूपाच्या माध्यमातून कुठलीही रक्कम कर्मचाऱ्यांना मिळत नसल्यामुळे मुख्य लेखापाल यांच्यासमोर खंत व्यक्त केली व पालिका आयुक्त शितल तेली उगले यांच्यासमोर हा गंभीर विषय सादर करून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निदान सेवा निवृत्तीच्या वेळी फंडाचा चेक तरी द्यावा अशी ट्रेड युनियनच्या माध्यमातून मागणी केली. 0तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मुलानी सेवानिवृत्तीनंतर आपल्या आई-वडिलांना चांगल्या प्रकारचा सांभाळ करावा व त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी हेच मुलांचे प्रथम कर्तव्य असल्याचे सांगितले.

यावेळी मुख्य लेखापाल रत्नाकर जवळगेकर यांनी प्रमुख उपस्थिती म्हणून मनोगत व्यक्त करत असताना म्हणाले, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या ज्या काही देय रकमा असतील त्या देय रखमा संदर्भात लवकरच आयुक्त शितल तेली उगले यांच्या समवेत चर्चा करून त्यांच्या निदर्शनास आणून देऊन कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर त्यांच्या हक्काच्या देय रकमा कशा मिळतील किंवा निदान सेवा निवृत्तीच्या कार्यक्रमा दिवशी कर्मचाऱ्यांना फंडाचा चेक व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या देय रकमा देण्याचा १००% प्रयत्न करणार असल्याचे सांगून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यास पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित मान्यवर लोखंडे, हिरोळी सर यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.

यावेळी ट्रेड युनियनचे प्रमुख संघटक स्वप्निल दिलपाके, संतोष गायकवाड, अभिजीत रणदिवे, बाजीराव कांबळे, अतुल जाधव, हिरा मस्के, अजय कोळेकर, अरुण लोखंडे, देवानंद जाधव व प्रभागातील कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!