दिलीप कोल्हे यांच्या वतीने बचत गटातील महिलांना देवदर्शन यात्रा, महिलांनी कोल्हे परिवाराचे केले कौतुक

2 Min Read

सोलापूर : प्रतिनिधी

तेजस्विनी महिला उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष, माजी उपमहापौर, शिवसेना शहर समन्वयक दिलीप कोल्हे यांच्या वतीने दरवर्षी बचत गटातील महिलांसाठी देवदर्शन यात्रा काढण्यात येते. याही वर्षी श्री दत्त महाराजांचे जन्म ठिकाण पिठापूर आणि अनेक आजू बाजूच्या देव दर्शन ठिकाणी दर्शन यात्रा काढण्यात आली. जवळपास बचत गटातील 100 महिला या यात्रेत सहभागी झाले.

गेल्या १२ वर्षापासून उत्तर भारत, दक्षिण भारत, कन्याकुमारी, बेंगलोर, मैसूर, अजमेर शरीफ, दिल्ली, आग्रा, राजस्थान, यासह अनेक ठिकाणी दिलीप कोल्हे यांच्या वतीने बचत गटातील शेकडो महिलांना देवदर्शन सांस्कृतिक सहल यासह पर्यटनाची माहिती मिळावी यासाठी सहलीचा आयोजन करण्यात येतो. बचत गटातील महिला या गरीब कुटुंबातील असून त्यांना एवढ्या लांब जाता येत नाही, त्यांना जाता यावं देवदर्शन, सांस्कृतिक, पर्यटन आणि व्यावसायिक दृष्ट्या विविध राज्यातील माहिती मिळावी, यासाठी ही सहल आयोजित करण्यात येते. अशी माहिती आयोजक दिलीप कोल्हे आणि माजी नगरसेविका मंगलाताई कोल्हे यांनी दिली.

आम्हीं बचत गटातील महिला असून काम केल्यानंतर आमचे घर चालते, मी कधी सोलापूरच्या बाहेर गेलो नाहीत परंतु बोलले परिवाराच्या मुळे आम्ही देशातील अनेक राज्यात जाऊन देवदर्शन केले महिलांचे व्यवसाय पाहिले त्यामुळे आम्हाला बाजारपेठेत का विकले जातात याची माहिती मिळाली त्यांच्या आयोजनाबद्दल बचत गटातील महिलांनी कोल्हे कुटुंबीयांची आभार मानले.

तेजस्विनी महिला उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष, माजी उपमहापौर, शिवसेना शहर समन्वयक दिलीप कोल्हे, काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील रसाळे, मराठा क्रांती मोर्चा समन्वयक संजय शिंदे, भाजपचे शहर चिटणीस शेखर फंड, माजी नगरसेविका मंगलाताई कोल्हे, बाळासाहेब सुरवसे, जयश्री माने, मनिषा कोल्हे, उषा नायडू, कविता चव्हाण, वैशाली अनुसये, अर्चना लांबतुरे, चैत्राली बाबर, वंदना जाधव, शोभा ननवरे, मल्लवा गोडसे, अनुराधा पोखरकर, सुनंदा पोखरकर, संगीता पोखरकर यांच्यासह अनेक महिला उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!