लैंगिक छळ रोखण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या सह ॲड.श्रेया कालेकर यांनी केले मार्गदर्शन

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर म्हणगरपालिकेच्या वतीने कार्यालयांमध्ये महिलांचा कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियम २०१३ बद्दल जनजागृती करण्यासाठी तसेच, ते प्रकार रोखण्यासाठी महापालिकेच्या महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांना एकदिवसीय कार्यशाळेत प्रशिक्षण देण्यात आले.
महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण, जनजागृती करण्यास तसेच, अधिकारी व कर्मचाऱ्यांना कायद्याविषयी माहिती देण्यासाठी कार्यशाळा घेण्यात आली. कॉन्सिल हॉल येथे झालेल्या कार्यशाळेचे उद्घाटन ऍडव्होकेट श्रेया कालेकर व ऍडव्होकेट रेणुका जोशी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मुख्य लेखा परीक्षक रुपाली कोळी,सहा. आयुक्त अनिता मगर,विशाखा समितीचे अध्यक्षा नगर अभियंता सारिका आकूलवार, आरोग्य अधिकारी राखी माने,सचिव ओमप्रकाश वाघमारे, सदस्य संद्या भाकरे,तेजस्विता कासार उपस्थिती होते.
लैंगिक छळ कायद्याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. महिला कर्मचाऱ्यांचे हक्क आणि त्यांच्यावर अन्याय झाला असल्यास योग्य न्याय मिळवून देऊन अनुकूल वातावरण निर्माण करून देण्यासाठी प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ कायद्याबाबत माहिती दिली. विविध विभांगांतर्गत गठित समितीचे अध्यक्ष आणि सदस्य यांना कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळाविषयी तक्रार प्राप्त झाल्यास त्या तक्रारीचे निराकरण योग्य पद्धतीने कशाप्रकारे केले जावे. याबाबत माहिती दिली. कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ होवू नये, याकरिता कशाप्रकारे प्रतिबंध करता येईल त्याचे प्रशिक्षण दिले.या प्रशिक्षणास विविध विभागांतील महिला अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.