सोलापूर : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाच्या अध्यक्षपदी सुशील बंदपट्टे यांची निवड झाल्याबद्दल, मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम बिग्रेड यांच्या वतीने लक्ष्मी मार्केट येथील हनुमान मंदिर जवळ त्यांचा हार घालून हाजीमतीन बागवान यांची हस्ते सत्कार करण्यात आला.
तसेच महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोग विभाग वसीम बुहूरान यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी. राजा बागवान, इरफान शेख, इरफान शेख, युनूस भाई बागवान, शरीफ रचभारे, फायज मुनसी, छत्रपती शिवाजी मुस्लिम बिग्रेड सोलापूर आणि सर्व पदाधिकारी आदी उपस्थित होते.