हिंदू रक्षक मित्र मंडळ शिवजन्मोत्सव 2025 च्या नूतन अध्यक्षपदी साईनाथ वानखरे यांची निवड

सोलापूर : प्रतिनिधी
निराळे वस्ती येथील हिंदू रक्षक मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात आनंदात साजरा करण्यात येतो. यंदाच्या वर्षीही शिवजन्मोत्सव 2025 हा महोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे.
यंदाच्या हिंदू रक्षक मित्र मंडळ शिवजन्मोत्सव 2025 नूतन पदाधिकारी निवड हिंदु रक्षक कार्यालयात निराळे वस्ती येथील कार्यालयात बैठक घेण्यात आली. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शेखर फंड यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली ही बैठक घेण्यात आली.
यावेळी हिंदू रक्षक मित्र मंडळ शिवजन्मोत्सव 2025 च्या नूतन अध्यक्षपदी साईनाथ वानखरे, उपाध्यक्ष स्वप्निल चव्हाण, वैभव काळे, सेक्रेटरी शेखर सातपूते, खजिनदार प्रमोद नागने, मिरवणूक प्रमुख संजय सातपूते, कार्याध्यक्ष समर्थ पेटकर, लेझीम प्रमुख नितीन शिंदे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. यावेळी मंडळाचे सल्लागार, मार्गदर्शक आणि सदस्य युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.