भाजपचे मिशन 400 पार 230 पर्यंत येवून थांबेल, मराठा आंदोलनाचा भाजपाला फटका बसेल असा अंदाज योगेश पवार यांनी केला व्यक्त.
मराठा आंदोलनाचा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील भाजपला फटका, 10-12 जागेवर बसेल भाजपला फटका : योगेश पवार (प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रीय छावा संघटना)

सोलापूर : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीचा निकाल 04 जून 2024 ला येणार आहे तो काय येईल, तो येईल. परंतु, निवडणुकीबाबतचे विविध सर्व्हे रिपोर्ट, जनमत चाचण्या व देशातील एकूण परिस्थिती याचा एकत्रित विचार केल्यास भाजपचे मिशन 400 पार 200-230 पर्यंत जावून थांबेल, असे चित्र आहे. तसेच सन 2019 मध्ये लोकसभेच्या एकूण 543 जागापैकी एकट्या भाजपने 303 जागा, तर NDA ने 353 जागा जिंकल्या होत्या. परंतु, त्या 303 जागा टिकवणे सुध्दा यावेळी भाजपला चांगलेच जड जाणार आहे. कारण एकूण राजकीय परिस्थितीचा सखोल अभ्यास केल्यास 2024 मध्ये भाजप 195 ते 230, तर मित्रपक्ष 30 जागा जिंकेल, असाच प्राथमिक अंदाज आहे.
महाराष्ट्रातील 48 जागेचा विचार केल्यास गेल्या वेळी भाजपाने 23 व शिवसेनेने 19 अश्या एकूण 42 जागा जिंकल्या होत्या तर काँग्रेस 01 तर राष्ट्रवादी 04 व अपक्ष उमेदवाराने 01 जागा जिंकली होती. परंतु, यंदा मात्र पाच वर्षात तीन वेळा बदलेले सरकार व भाजपने फोडलेले पक्ष आणि अजित पवार, छगन भुजबळ व अशोक चव्हाण सारख्या भ्रष्टाचारी नेत्यांना दिलेला राजाश्रय याचा परिणाम भाजपाच्या मतदान टक्केवारीवर होणार आहे. त्यामुळे राज्यात UBT, कॉंग्रेस व NCP-SP गट म्हणजेच महाविकास आघाडीची स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. UBT_काँग्रेस_NCP-SP ला चांगलं यश मिळेल. तर महायुतीच्या निम्म्या जागा कमी होतील. सर्व्हेच्या प्राथमिक अंदाजानुसार यंदाच्या निवडणुकीत UBT ला 14-15, तर काँग्रेसला 08-10, तर NCP-SP 05-06 जागा असे एकूण मिळून 27-31 जागा मिळण्याचा अंदाज आहे. भाजपला 15-16, सेना 02-03, NCP 00-02 असे एकूण मिळून 17-21 मिळू शकतात. मराठा आंदोलनाचा मराठवाडा व काही प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रातील विशेष करून 10-12 जागेवर भाजपला फटका बसेल, त्यामुळे भाजपचे सीट कमी येतील. असा अंदाज राष्ट्रीय छावा संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष योगेश पवार यांनी व्यक्त केला.