सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदेंनी श्रीरामनवमीचा मुहूर्त साधत प्रचाराचा शुभारंभ पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी नतमस्तक होऊन नारळ फोडून केला. गुरुवारी 18 एप्रिल रोजी सकाळी साडेनऊ वाजता रॅली द्वारे महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदेंनी आपल्या अधिकृत प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी राम नवमीचा मुहूर्त निवडला आहे. सर्व प्रमुख मंदिरांमध्ये नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करताना मवाळ हिंदुत्वाची भूमिका जोपासत भाजपच्या हिंदुत्वाचा मुद्दा ताकदहीन करण्याचा हेतू यातून दिसून येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.