“आयुक्त साहेब जरा लक्ष द्या”, २२ जून २०१८ पालिकेच्या पत्रानुसार जागेतील आरक्षणा प्रमाणेच विकसीत करणे बंधनकारक, मग जागा विकली कशी.?

सोलापूर : प्रतिनिधी
सुमती जोजारे या स्वतः उमानागरी सहकारी संस्था नंबर १३ या संस्थेची सभासद आहे. त्यामुळे सदरच्या आरक्षित जागेबाबत तक्रार करण्याची कायदेशीर लोकस स्टैंडी Locus Standy त्यांना आहे. उमानगरी सहकारी संस्था नंबर १३ फायनल प्लॉट नंबर १०५ मधील प्लॉट नंबर २०५ हा मंजूर विकास योजनेनुसार आरक्षण क्रमांक ०१/४५ अन्वये व १४ जून १९९९ च्या अंतिम मंजूर रेखांकनानुसार रिक्षा स्टॉप व पार्किंगसाठी आरक्षित केलेला आहे. परंतु ही जागा चेअरमन यांनी परस्पर त्रियस्थ व्यक्तीला विक्री केली आहे ही आरक्षित जागा घेणाऱ्या व्यक्ती हे गुंडगिरी आणि दडपशाही करत असल्याची तक्रार सुमती जोजारे यांनी लेखी निवेदनाद्वारे महापालिका आयुक्तांना केली आहे यावर महापालिकेचे काम सुरू आहे.
पुर्वी त्या आरक्षित जागेवर काही सभासद गाड्या पार्क करीत होते तर काही रिक्षाही तिथे थांबत होत्या. परंतु चेअरमनने तिथे पार्किंग केलेल्या गाड्या व रिक्षा फोडण्याची धमकी दिली व ती जागा विक्री केली. पार्किंग व रिक्षा स्टॉपसाठी आरक्षित जागा असतानाही संस्थेचे चेअरमन यांचेशी संगनमत व आर्थिक देवाण-घेवाण करून प्लॉट धारक व्यक्तीने अनाधिकारने व बेकायदेशीर पणे उमा नगरी नंबर १३ येथील प्लॉट नंबर २०५ या आरक्षित असलेल्या त्या जागेवर कब्जा केला आहे.
या बाबत २२ जून २०१८ च्या प्र. सहाय्यक संचालक, नगररचना सोलापूर महानगरपालिका, सोलापूर यांच्या पत्रातील मजकूर पुढीलप्रमाणे आहे. टि.पी.४. फा.प्लॉट नं.१०५, या जागेवर मंजुर विकास योजनेनुसार आरक्षण क्र. १/४५ पार्किंग चे आरक्षण आहे, व क्र.३८ दिनांक. १४/०६/१९९९ ने टि.पी.४, फा. प्लॉट नं.१०५ वर रेखांकनास मंजुरी देण्यात आली असून सदर मंजुर रेखांकनामध्ये सब प्लॉट नं.२०५ येथे पार्किंग व रिक्षा स्टॅन्ड करिता आरक्षण क्र.१/४५ असे दर्शविले आहे. याप्रमाणे सदरचे आरक्षण कायमस्वरुपी असून त्यामध्ये बदल करता येणार नाही. सदर जागेतील आरक्षणाप्रमाणेच विकसीत करणे बंधनकारक राहील.
असे असताना देखील संबंधितांनी तो आरक्षित प्लॉट विक्री केला आहे. पार्किंगची आरक्षित जागा विकता येते का.? आरक्षित जागा विकण्यास सभासदांची परवानगी आहे का.? सभासदांना विश्वासात घेतले का.? यासह अनेक प्रश्न यातून उपस्थित होत आहेत. असेही सुमती जोजारे यांनी म्हणाले. आता ही जागा विकणारे आणि घेणारे यांचे पुढे काय होणार, ते पाहूयात पुढील भागात..