अनाथ आश्रम मधील मुलांसोबत रंगपंचमी, आस्था फाउंडेशनने जपली सामाजिक बांधिलकी

2 Min Read

सोलापूर : प्रतिनिधी

आस्था फाऊंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. रंगपंचमीचा रंगिबेरंगी रंगात न्हाऊन निघाला संस्कार संजीवनी अनाथ आश्रम च्या मुला मुलीं सोबत यंदाची रंगपंचमी साजरा करण्यात आली.

प्रत्येक जण आपापल्या घरात रंगपंचमी साजरा करतात पण आस्था रोटी बँक हे अनाथ आश्रम च्या मुलासोबत रंगपंचमी साजरी केली. ज्या मुलांना सणवार माहीत नसते अशा मुलांसोबत रंगपंचमी साजरा करतात पण त्या मुलांच्या चेहऱ्यावर एक आनंद खुशी दिसून आले अशा मुलांसोबत रंगपंचमी साजरा करताना आस्था रोटी बँकेचे संपूर्ण टीम रंगपंचमी साजरा केली.

त्या मुलांच्या चेहऱ्यावरचे हास्य खूप काही सांगून गेले तेथील मुला-मुलींना आपल्या घरची आठवण सुद्धा होऊ देत नाहीत अशा मुलांसोबत रंगपंचमी खूप उत्साहामध्ये आस्था रोटी बँक साजरा केले.

आस्था रोटी बँकेचे विजय छंचुरे यांनी अनाथ आश्रम च्या मुलांसोबत संपूर्ण टीम सहभागी झाले होते.

त्या मुलांच्या चेहऱ्यावर हास्य पाहून आस्था रोटी बँकेचे महिला सदस्य खूप भावून झाले होते. जेथे कमी तेथे आम्ही असे महिला सदस्यांनी मत व्यक्त केले. अनाथ आश्रम च्या मुला मुलींना जेवण देण्यात आले त्यामध्ये बासुंदी, जिलेबी, चपाती बटाट्याची भाजी व मसाला भात देण्यात आले. तसेच मुलांना व मुलींना पिचकारी, इको फ्रेंडली कलर, रंग, फुगे, कोल्ड्रिंक इत्यादी देण्यात आले.

संस्कार संजीवनी आश्रम चे व्यवस्थापक परमेश्वर काळे यांनी आस्था रोटी बँकेचे आभार मानले अनाथ आश्रम च्या मुला व मुली सोबत रंगपंचमी साजरा करण्यात आलेले.

त्यावेळी नीलिमा हिरेमठ, कांचन हिरेमठ, पुष्कर पुकाळे, संपदा जोशी, नीता आकुडे, श्रद्धा अध्यापक, सरोजिनी घोडके, विद्या माने, सुरेखा पाटील, प्रकाश डोंगरे, हे सर्वजण उपस्थितीत होते. आस्था रोटी बँक नेहमीच समाज उपयोगी कार्यक्रम करते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!