क्राईममहाराष्ट्रसामाजिकसोलापूर

घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरटयांना अटक, घरफोडीचे ०५ गुन्हे उघडकीस, शहर गुन्हे शाखेची कामगिरी

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर शहरामध्ये मागील कांही दिवसामध्ये रात्रीचे वेळी बंद घरामध्ये घरफोडी करुन चोरीचे गुन्हे घडत असल्याने, सदरचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत वरिष्ठांनी गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना मार्गदर्शन केले होते. त्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे पोउपनि अल्फाज शेख व पथकातील पोलीस अंमलदार पोह/१३७९ बापू साटे, पोशि/१७२५ सुभाष मुंढे, पोशि/१७१२ सैपन सय्यद, पोशि/१६०२ वसिम शेख असे, सोलापूर शहर परिसरात अशाप्रकारे गुन्हे करणाऱ्या आरोपींचा शोध घेत होते. त्याच बरोबर सोलापूर शहरातील विविध ठिकाणावरुन प्राप्त सी.सी.टी.व्ही. फुटेजची पाहणी करुन, त्याचे तांत्रिक विश्लेषण केले.

दरम्यान, पोउपनि अल्फाज शेख व त्यांचे पथकास, यातील आरोपी हे कांही कामानिमित्त रुपाभवानी मंदीराचे परिसरामध्ये, स्मशान भूमीजवळ, सोलापूर येथे येणार असल्याची माहिती गोपनिय बातमीदाराचे मार्फतीने बातमी प्राप्त झाली.

त्या गोपनियम माहितीच्या अनुषंगाने ११ मार्च २०२५ रोजी पोउपनि अल्फाज शेख व पथक आणि सपोनि शैलेश खेडकर व त्यांचे तपास पथक यांनी बातमीचे ठिकाणावरुन (१) सिध्दू शामराव काळे, वय ३९ वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. मु.पो. चिचोली एमआयडीसी, ता. मोहोळ, जि. सोलापूर, (२) बजरंग नागनाथ चव्हाण, वय २९ वर्षे, व्यवसाय-ड्रायव्हर, रा. सनमडीकर हॉस्पीटलजवळ, सातारा रोड, डॉ. आंबेडकर पुतळयाचे पाठीमागे, जत, जि. सांगली, (३) नरसिंह नागप्पा बल्लारी, वय ३१ वर्षे, व्यवसाय-ड्रायव्हर, रा. सनमडीकर हॉस्पीटलजवळ, सातारा रोड, डॉ. आंबेडकर पुतळयाचे पाठीमागे, जत, जि. सांगली, (४) सचिन दामोदर सावंत, वय ३५ वर्षे, व्यवसाय-शेती, रा.मु.पो. बनाळी, ता.जत, जि. सांगली, सध्या रा. श्रेयश गायकवाड यांच्या घरात भाडयाने, महाविद्यालयाचे पाठीमागे, कडलास रोड, सांगोला, जि. सोलापूर यांना ताब्यात घेतले. त्यानंतर, त्यांच्याकडे विचारपूस केली असता, इसम नामे सिध्दू शामराव काळे व बजरंग नागनाथ चव्हाण यांनी, त्यांचे इतर ०३ साथीदारांसह मिळून, फेब्रुवारी २०२५ मध्ये रात्रीचे वेळी पोशम्मा मंदिराजवळ, धनलक्ष्मी नगर, जुना विडी घरकुल, सोलापूर येथील परिसरामध्ये एका बंद घराच्या मुख्य दरवाज्याचे कडी व कोयंडा तोडुन त्यातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरी केली असल्याची कबुली दिली. तसेच इसम नामे नरसिंह नागप्पा बल्लारी याच्या मार्फतीने, त्यांचे वाटणीस आलेले सोन्या-चांदीचे दागिने, सोनार सचिन दामोदर सावंत यास विक्री केले असल्याचे सांगितले. त्याबाबत अभिलेख पडताळले असता, वरील नमुद घरफोडीबाबत एमआयडीसी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. १२६/२०२५ भा.न्या.सं. कलम ३३१ (४), ३३१ (३), ३०५ (a), ३१७ (२) प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे दिसुन आले. यावरुन आरोपी क्र. १ ते ४ यांना सदर गुन्हयात ११ मार्च २०२५ रोजी अटक करण्यात आली.

तद्भतर, आरोपी क्र. १ ते ४ हे पोलीस कोठडीत असताना, त्याच्याकडे कौशल्यपुर्ण तपास केला असता, आरोपी नामे सिध्दू शामराव काळे व बजरंग नागनाथ चव्हाण यांनी त्यांचे इतर ०३ साथीदार यांच्यासह मिळून, एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे कडील वर नमूद गुन्हा, तसेच सोलापूर शहरात खालीलप्रमाणे आणखी ०४ ठिकाणी रात्रीचे वेळी घरफोडी चोरीचे गुन्हे केले असल्याची कबुली दिली आहे. तसेच या गुन्हयातील चोरी केलेले आणि त्यांचे वाटणीस आलेले सोन्या-चांदीचे दागिने आरोपी नरसिंह बल्लारी याचे मार्फतीने, आरोपी (सोनार) सचिन सावंत यास विक्री केलेबाबत सांगितले आहे. यावरुन आरोपी क्र. १ ते ४ यांच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस आणले आहेत.

आरोपी सिध्दू काळे व बजरंग चव्हाण याच्याकडून, जोडभावी पेठ गु.र.नं. ६६९/२०२४ या गुन्हयातील चोरीस गेलेल्या रोख रक्कमेपैकी, त्यांच्या वाटणीस आलेली व खर्च करुन शिल्लक राहिलेली ६२,००० /- रुपये रोख रक्कम जप्त केली आहे. तसेच आरोपी (सोनार) सचिन सावंत याच्याकडून ०४ गुन्हयातील चोरीस गेलेले सोन्या-चांदीचे रु.३,९०,४०० किमतीचे एकूण ९६ ग्रॅम दागिने जप्त करण्यात आले आहेत.

सदरची कामगिरी एम. राज कुमार, पोलीस आयुक्त, सोलापूर शहर, डॉ. दीपाली काळे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, राजन माने, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे, सुनिल दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली, स.पो.नि./शैलेश खेडकर, पोलीस उप-निरीक्षक अल्फाज शेख, पोलीस अंमलदार-बापू साठे, वसिम शेख, सुभाष मुंढे, सैपन सय्यद, राजकुमार पवार, विनोद रजपूत, इम्रान शेख, उमेश पवार, चालक सतिश काटे, बाळासाहेब काळे, यांनी केली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!