बेकायदेशीर बांधकाम परवाना प्रकरण

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर महानगरपालिका बांधकाम परवाना विभागातील सहा अभियंता झाकीर नाईकवाडी, कनिष्ठ अभियंता श्रीकांत खानापुरे रा. सोलापूर यांनी सोलापूर येथील सत्र न्यायालयामध्ये जामीन अर्ज दाखल केला असून, सदर प्रकरणात नाईकवाडी व खानापुरे यांनी सरकार पक्षाने महानगरपालिकेतील ऑनलाईन बांधकाम परवाना संदर्भातील सर्व कार्यालयीन अध्यादेष, परिपत्रके दाखल करावेत अशी मागणी अर्जाद्वारे न्यायालयामध्ये केलेली आहे. सदर आरोपीनी कोणतेही गैरकृत्य केलेले नाही जी.आर प्रमाणे, परिपत्रक प्रमाणे काम केलेले आहे हे त्यातून स्पष्ट होणार आहे, त्यामुळे ते सर्व परिपत्रके कोर्टासमोर येणे गरजेचे आहे. सदर कागदपत्रे मागण्याच्या अर्जावर न्यायालयाने सरकारी वकिलांचे म्हणणे मागवलेले आहे..
थोडक्यात हकीकत अशी की, जानेवारी 2021 ते डिसेंबर 2022 यादरम्यान महापालिकेतील बांधकाम परवाना विभागातील सहाय्यक अभियंता झाकीर नाईकवाडी व कनिष्ठ अभियंता खानापुरे हे महापालिकेच्या बांधकाम विभागातील अधिकारी म्हणून काम पाहत होते त्या काळात त्यांनी अधिकार नसताना बांधकाम परवाने दिले व महापालिकेचे नुकसान केले. या प्रकरणी बांधकाम विभागाचे अभियंता बसवराज मठपती यांनी पोलिसात तक्रार दिली होती सदरकामी 18 फेब्रुवारी रोजी सदर बझार पोलिसांनी नाईकवाडी आणि खानापुरे यांना अटक केली होती. करून सोलापूर येथील न्यायाधीश श्री भंडारी यांनी दोघांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर नाईकवाडी व खानापुरे यांनी एडवोकेट शशी कुलकर्णी यांचे मार्फत सोलापूर येथील सत्र न्यायालय मध्ये जामीन अर्ज दाखल केलेला आहे. सदर कागपत्रे मागणीच्या अर्जावर म्हणणे दाखल करण्यासाठी पुढील सुनावणी सत्र न्यायाधिश श्री मोहिते साहेब यांचे समोर दि. 21 मार्च 2025 रोजी होणार आहे.
सदर कामी आरोपींतर्फे ॲड. शशी कुलकर्णी. ॲड. गुरुदत्त बोरगावकर, ॲड. आदित्य अदोने, ॲड. प्रणव उपाध्ये हे काम पाहत आहेत.