तुळजापूर रोड वरील कचरा डेपो, बायो एनर्जी प्लांट, ट्रान्स्फर स्टेशन येथे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिली भेट

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आज शहरातील एचएसआर टाकी जुळे सोलापूर, रुपाभवानी चौक या चार ठिकाणी ट्रान्स्फर स्टेशनचीं पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त रवि पवार, मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार, सफाई अधिकारी अनिल चाराटे आदी मान्यवर उपस्थिती.
शहरातील घरोघरी घंटागाडी द्वारे कचरा कशा पद्धतीने गोळा करण्यात येतो. रोज किती टन कचरा जमा केला जातो. नंतर तो ट्रान्स्फर स्टेशन या ठिकाणी ओला व सुखा विलगिकरण करून त्या ठिकाणीहुन मोठ्या आरसी हुक लोडर वाहनतून कचरा डेपोला जाते. तसेच दैनंदिन येणाऱ्या कचरावर बयो -एनर्जी प्लांट येथे प्रकीया करून या ठिकाणी वीज निर्मिती व खत निर्मिती केली जाते. या ठिकाणी कशा पद्धतीने कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते इत्यादी संदर्भात माहिती घेतील.
बयो -एनर्जी या ठिकाणी ३ मेगाव्हेट वीज निर्मिती तर २०/25 टन दररोज कपोस्ट खत तयार केला जातो. तुळजापूर रोड येथीलनवीन तयार करण्यात आलेले मृत प्राणी यांची विद्युत दाहिनीची पाहणी करून माहिती घेतली.