क्राईममहाराष्ट्रसामाजिकसोलापूर

नाईंट्या उर्फ ओंकार नलावडे ची धुसगुड, पोलीस निरीक्षकाच्या छातीवर मारली बुक्की

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर शहरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला छातीवर बुक्की मारत पोलीस शिपायाच्या शर्टाला धरून ओढा ओढी करून त्यांना धक्काबुक्की केल्या प्रकरणी एका युवका विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. नाईंट्या उर्फ ओंकार संतोष नलावडे राहणार सुंदरबाई डागा प्रशाला दमानी नगर सोलापूर असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे.

पोलीस कॉन्स्टेबल दिनेश नारायण घंटे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपीत व इतर दोन ते तिन इसम यांचेत तक्रार चालु होती. वरील आरोपीत हा स्वतःहुन रस्त्याचे कडेला असलेल्या फुटपाथवर स्वतःचे डोके व तोंड आपटुन घेत असल्याने त्याचे डोक्यातुन रक्त येत होते. वरील आरोपीत यास रिक्षातून पोलीस ठाणे येथे आणत असताना रिक्षा मध्ये फिर्यादीच्या अंगावर थुंकून शिवीगाळ करुन फिर्यादीच्या शर्टाला धरुन ओढा ओढी केली. पोलीस ठाणे येथे उपचाराची वैदयकीय यादी तयार करीत असताना वरील आरोपीताने शिवीगाळ करुन परत अंगावर थुंकला. आरोपीत हा आरडाओरड करीत असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी त्यास शांत बसण्यास सांगत असताना त्याने माने यांच्या छातीवर डावे बाजूस हाताने बुक्की मारली सर त्यास अडवत असताना त्याने हाताने त्यांचे उजव्या हाताचे मनगटाजवळ मारल्याने त्यांना जबर मुका मार लागला आहे. सदर इसमाने पोलीसांचे शासकिय कामात अडथळा आणुन फिर्यादीस धक्का बुक्की करुन वपोनि माने यांचे छातीवर मारुन जबर दुखापत केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!