महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनची मागणी, आयुक्त डॉ ओबासे यांचा सकारात्मक प्रतिसाद, मागणीला आले यश

सोलापूर : प्रतिनिधी
सालाबादप्रमाणे सोलापूर शहरामध्ये विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व रमजान ईद हे सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेमधील कर्मचाऱ्यांना हे दोन्ही सण मोठ्या उस्ताहात साजरा करिता कर्मचाऱ्यांना ऍडव्हान्स १५०००, रुपये व मार्च महिन्याचे वेतन एप्रिल १० तारखेच्या आत अदा करावे अशी बैठकीत मागणी केली. आयुक्त डॉ. सचिन ओंबासे साहेब यांनी कर्मचाऱ्यांना १२५०० रुपये ऍडव्हान्स व मार्च महिन्याचे वेतन १० एप्रिल २०२५ तारखेपर्यंत अदा केले जाईल असे आश्वासन महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनचे अध्यक्ष कामगार नेते बापूसाहेब सदाफुले यांना दिले.
बैठकीत संबंधित अधिकारी मुख्य लेखापाल रत्नराज जवळगेकर यांना तसे परिपत्रक काढण्या संदर्भात सूचना केल्या. यावेळी ट्रेड युनियन अध्यक्ष कामगार नेते बापूसाहेब सदाफुले यांनी आयुक्त डॉ.सचिन ओंबासे व तसेच मुख्य लेखापाल रत्नराज जेवळगेकर यांचे आभार मानले.
यावेळी ट्रेड युनियनचे खजिनदार अरुण मेत्रे, राम चंदनशिवे, सुनील शिंदे, संतोष गायकवाड, पदाधिकारी व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.