स्कुल बसच्या चाकाखाली डोके चिरडुन विद्यार्थ्याचा करुण अंत, नातेवाईकांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

1 Min Read

सोलापूर : प्रतिनिधी (बेलाटी)

अनुराग तिप्पण्णा राठोड (वय 13) राहणार बसवेश्वर नगर, देगांव असून शाळेचे नांव संत गाडगेबाबा प्राथमिक आश्रम शाळा, कवठे, सोलापूर असे आहे. देगांव-बेलाटी रस्त्यावर सदरचा अपघात आज 8 एप्रिलला दुपारी 12 च्या सुमारास घडला असून अपघात स्थळी नागरिकांची गर्दी झाली होती.

सलगरवस्ती पोलीस स्टेशन येथील पोलीस घटनास्थळी पोहचून अपघातास कारणीभूत असलेली स्कुल बस ताब्यात घेऊन सलगरवस्ती पोलीस स्टेशन येथे सदरची स्कुल बस आणुन लावली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

घटनास्थळी उपस्थित नागरिकांचे म्हणणे असे आहे कि, सदर स्कुल बसमधे क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी प्रवास करत होते व चालत्या गाडीतून मृत विद्यार्थी खाली पडला व याच गाडीची चाके त्याच्या डोक्यावरुन गेल्याने डोक्याचा अक्षरशा चेंदामेंदा होऊन अवघ्या काही सेकंदातच विद्यार्थी जागीच मरण पावला.

पूढील वैद्यकीय तपासणी करण्यासाठी विद्यार्थ्याचे शव सिव्हील हॉस्पिटल सोलापूर येथे नेण्यात आले आहे. हॉस्पिटलमधे नागरिक व मृताचे नातेवाईक यांची गर्दी झाली असून त्यांचे म्हणणे असे आहे कि जोपर्यंत संबधित स्कुल बस चालक व शाळा संस्था चालकांवर हलगर्जीपणा करुन मृत्युस कारणीभूत ठरल्यामुळे संबंधितावर गुन्हा दाखल होऊन आरोपींना अटक होत नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!