12 एप्रिल रोजी श्री बिरोबा महालिंगराया देवाची यात्रा महोत्सव २०२५ चे आयोजन

1 Min Read

सोलापूर : प्रतिनिधी

१२ एप्रिल २०२५ रोजी चैत्र पौर्णिमा निमित्त श्री. बिरोबा व महालिंगराया देवाची यात्रा अश्विनी हॉस्पिटल समोर, लष्कर येथे असलेल्या मंदिर परिसरात यात्रा महोत्सव आयोजित करण्यात आलेली आहे. या यात्रा महोत्सवानिमित्त अभिषेक महापूजा, पालखी सोहळा व पालखी भेट, ओव्या, वीर खेळणे, महाप्रसाद वाटप इत्यादी कार्यक्रम होणार आहे.

अश्विनी हॉस्पिटल समोरील लष्कर मंदिर परिसरात सायं ५.३० वा. ते रात्री १०.३० वा. पर्यंत विविध कार्यक्रम होणार आहेत. सायंकाळी ६.०० वा. मुख्य सोहळा आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमांचे अध्यक्षस्थानी पालकमंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार प्रणिती शिंदे, आमदार देवेंद्र कोठे, माजी आमदार रामहरी रुपनवर, माजी आमदार रामभाऊ सातपुते, भाजपाचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे, माजी सभागृह नेते सुरेश पाटील, आदि मान्यवर उपस्थित राहणार आहे.

पत्रकार परिषदेस यात्रा उत्सव समितीचे अध्यक्ष अमोल कारंडे, सुनिल खटके, अण्णप्पा सत्तुबर, भारत कटारे, गुरुभाई कावडे, रमेश तरंगे, सदाशिव व्हनमाने, चंद्रकांत वाघमोडे, भगवान बनसोडे, शेखर बंगाळे इत्यादी उपस्थित होते.

श्री. बिरोबा महालिंगराया देवस्थानकडून सोलापूर शहर व जिल्हयातील सर्व भाविक भक्तांना विनंती आहे की, आपण सर्वांनी देवाच्या यात्रेस बहुसंख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी यात्रा कमिटीच्यावतीने आवाहन करण्यात आले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!