बसवण्णांनी देवाला भक्तांच्या हातात दिला : गिरीश जाखोटिया

2 Min Read

सोलापूर : प्रतिनिधी

बसवण्णांनी मानवी शरीराला मंदिर म्हणून संबोधले. मानवी शरीरातील पाय हे मंदिराचे खांब आहेत. धड हे मंदिराचे शिखर आहे आणि डोके हे कळस आहे. बाराव्या शतकात त्यांनी मानवाला इष्टलिंग धारण करण्यास सांगितले. अशा पद्धतीने त्यांनी देवाला भक्तांच्या हातात दिला असे प्रतिपादन गिरीश जाखोटिया यांनी केले.

वीरशैव व्हिजन बसव व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर आ. प्रवीण स्वामी (उमरगा), सोलापूर जिल्हा नागरी बँक असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश वाले, दक्षिण सोलापूर शिक्षण मंडळ विश्वस्त अण्णासाहेब कोतली, वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, उत्सव समितीचे अध्यक्ष विजयकुमार बिराजदार यांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना जाखोटीया म्हणाले की, आज 21 व्या शतकात स्त्रियांना आरक्षण देण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र बसवण्णांनी 12 व्या शतकातच अनुभव मंटपामध्ये स्त्रियांना प्रवेश दिला. ते खरे स्त्री आरक्षणाचे जनक आहेत. स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षांनी सामाजिक न्याय विभाग सुरु झाला. मात्र बसवण्णांनी आपल्या अनुभव मंटपात सर्वच जाती धर्मांना सामावून घेतले. त्यामुळे बसवण्णा सामाजिक सुधारण्याचे आद्य क्रांतिकारक आहेत.

यावेळी शिवानंद भरले, अशोक खानापुरे, शिवलिंगप्पा शाबादे, अनिल गिराम, विजय काडादी, मनोज पाटील, आनंद दुलंगे, बसवराज चाकाई, श्रीमंत मेरू, श्रीकांत कट्टीमनी, नागेश बडदाळ आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजशेखर बुरकुले यांनी केले. उपस्थितांचे स्वागत सोमेश्वर याबाजी यांनी केले. सूत्रसंचालन अरुंधती शेटे आभार प्रदर्शन विजयकुमार बिराजदार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अविनाश हत्तरकी, सोमनाथ चौधरी, बसवराज जमखंडी, शिव कलशेट्टी, सिद्धेश्वर कोरे, गौरीशंकर अतनुरे, आनंद नसली यांनी परिश्रम घेतले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!