सोलापूर : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट तेरावे वंशज छत्रपती खासदार उदयनराजे भोसले हे सोलापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तथा छत्रपती उदयनराजे भोसले यांचे निकटवर्तीय मनोज शिंदे यांच्या नूतन CURB रिअल इस्टेट & कन्ट्रक्शन च्या ऑफिसचे उद्घाटन छत्रपती उदयनराजे यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटना प्रसंगी बोलताना छत्रपती खासदार उदयनराजे भोसले महाराज म्हणाले, मनोज शिंदे हा प्रामाणिक आणि जुना सच्चा कुटुंबातील सदस्य आहे. त्याने कष्टातून आपला व्यवसाय उभा केला मी कायम त्याच्यासोबत आहे. CURB रिअल इस्टेट & कन्ट्रक्शन म्हणजे छत्रपती उदयनराजे भोसले असा असून हे माझे ऑफिस आहे. कोणतेही अडचण आली तर मनोज ने मला थेट कॉल करावा असे म्हणत त्यांनी मनोज शिंदे यांचे कौतुक केले.
जुना एम्प्लॉयमेंट चौकातील मंत्रालय हॉटेल शेजारी या नूतन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले असून यावेळी या कंट्रक्शनचे प्रमुख मनोज शिंदे आणि त्यांचे मित्रपरिवार उपस्थित होते.