केंद्रीय मध्य रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यपदी गणेश डोंगरे यांची निवड

1 Min Read

सोलापूर : प्रतिनिधी

खासदार प्रणिती शिंदे यांच्या शिफारसीनुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सिनेट सदस्य व सोलापूर युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांची भारत सरकारच्या केंद्रीय मध्य रेल्वे सल्लागार समिती (झेडआरयूसीसी) सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र मध्य रेल्वे चे उपमहाप्रबंधक कुश किशोर मिश्र यांनी दिले.

देशातील रेल्वे झोनपैकी महत्वपूर्ण असलेल्या मध्य रेल्वेचे मुख्यालय मुंबई हे असून या अंतर्गत मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूर व भुसावळ ये विभाग येतात. रेल्वे विभाग राष्ट्रीय, झोनल आणि विभाग पातळीवर अशा सल्लागार समिती स्थापन करीत असते रेल्वे बोर्डाककडून या समितीच्या नियुक्ती करण्यात येतात. प्रवासाच्या अडचणी, त्याला मिळणाऱ्या सोयी सुविधा या बाबत निर्णय घेणारी ही समिती आहे. मध्य रेल्वेसाठी झोनल रेल्वे वापरकर्ते सल्लागार समिती (ZRUCC) जी रेल्वेच्या वापरकरत्याचे प्रतिनिधित्व करते.

या निवडीनंतर गणेश डोंगरे यांनी खासदार प्रणिती शिंदे यांचे आभार मानले. येणाऱ्या काळात प्रवाशाच्या सुखसुविधा व रेल्वेच्या प्रगतीसाठी सातत्याने कृतिशील कार्य करण्या साठी प्रयन्तशील राहणार असल्याचे म्हटले आहे. मला दिलेली जबाबदारी सकारात्मक काम करत पार पाडेन.

या निवडी बद्दल देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेस अध्यक्ष चेतन नरोटे, माजी आमदार दिलीप माने, सोलापूर बाजार समिती संचालक सुरेश हसापुरे, नगरसेवक विनोद भोसले, सचिन गुंड यांनी अभिनंदन केले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!