सोलापूर : प्रतिनिधी
रोहिणी रामचंद्र तडवळकर या लहानपणापासून राष्ट्रसेविका समिती तसेच महाविद्यालयीन काळात विद्यार्थी परिषदेच्या कामात अग्रभागी आहेत. महाविद्यालयीन आणि शैक्षणिक आंदोलनामध्ये मोठा सहभाग होता 1992 ला सोलापूर महापालिकेला शुक्रवार पेठ परिसरातून भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या. 1992 ते 1997 त्यानंतर महापालिका परिवहन समिती सदस्य, 2002 ते 2007 पुन्हा तुळजापूर वेस, बाळीवेस परिसरातून नगरसेविका म्हणून निवडून आल्या.
2012 ते 2017 नगरसेविका आणि विरोधी पक्ष नेता, भारतीय जनता पार्टी महिला आघाडी शहर अध्यक्ष म्हणून देखील काम केलेले आहे.
त्याच प्रमाणे शुक्रवार पेठ भागात राणी लक्ष्मी बाई महिला पतसंस्थेच्या माध्यमातून या भागात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक या क्षेत्रातही आपल्या कामाचा ठसा उमटवलेला आहे. या शिवाय पुण्यश्लोक अहिल्या अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र स्तरावर अपंग कार्यक्षेत्रात त्यांच्या कामाची नोंद आहे. रोटरी मूकबधिर विद्यालय सोलापूर येथून प्राचार्य म्हणून निवृत्त झालेल्या आहेत. सोलापूर भाजपच्या इतिहासात प्रथमच महिला शहराध्यक्ष म्हणून रोहिणीताई तडवळकर यांची नियुक्ती झाल्याने सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.