सोलापूर : प्रतिनिधी
जोडभावी पेठ पोलीस ठाणे कडील गहाळ झालेले पैकी एकुण ३१ विविध अॅन्ड्रॉईड कंपनीचे मोबाईल्स (६,८५,०००/-रु) किंमतीचे तांत्रिक पध्दतीने शोध लावुन डी. बी. पथकाने उल्लेखनिय कामगिरी केली आहे
जोडभावी पेठ पोलीस ठाणे सोलापुर शहर येथे मोबाईल गहाळ झालेबाबत तक्रारी वाढल्याने दाखल झालेल्या गहाळ मोबाईल यांचा शोध घेणेबाबत वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुरज मुलाणी यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकासआदेशीत केल्यांने डी.बी.पथकाचे प्रमुख श्रीनाथ महाडीक यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ/१६८५ खाजप्पा परसप्पा आरेनवरु नेम-जोडभावी पेठ पोलीस ठाणे यांच्याकडे सदरचे काम सोपविण्यात आले होते. त्यांनी प्राप्त सीडीआरचे विश्लेषण करुन सन-२०२३, सन २०२४, सन-२०२५ मधील गहाळ झालेल्या पैकी ३१ विविध कंपनीचे अॅन्ड्रॉईड मोबाईल्स (हॅन्डसेट) कि.अं.-६,८५,०००/- रु किमंतीचे मोबाईल सोलापुर शहर व परजिल्हा, परराज्यातुन हस्तगत केलेले आहे.
सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त एम. राजकुमार साो, पोलीस उप-आयुक्त साो. (परिमंडळ) विजय कबाडे साो, सहा. पोलीस आयुक्त विभाग-१ प्रताप पोमण साो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज मुलाणी साो, पोनि/शबनम शेख साो(गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली जोडभावी पेठ पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख, सपोनि/श्रीनाथ महाडीक, पोहेकॉ/१६८५ खाजप्पा आरेनवरु, पोहेकॉ /९९३ पैकेकरी, सायबरचे नेमणुकीस असलेले पोकॉ/६९६अर्जुन गायकवाड, पोहेकॉ/६०१ प्रकाश गायकवाड यांनी पार पाडली आहे.