सोलापूर : प्रतिनिधी
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी हद्दीत श्रीशैल हत्तुरे यांनी ओपन प्लॉटची विक्री केली मात्र ताबा दिला नाही. अशा आशियाची तक्रार कुंभारी येथील लक्ष्मी नगर येथे प्लॉट खरेदी करणाऱ्या प्लॉट धारकांनी आमदार सुभाष देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
श्रीशैल हत्तुरे यांनी कुंभारी येथील लक्ष्मी नगर येथे लोकांना प्लॉट विकले, त्याचे पैसे घेतले मात्र मागील सहा वर्षांपासून प्लॉट धारकांना प्लॉटच्या कब्जा दिला नाही. सदर प्लॉटमधून माती विक्रीचा व्यवसाय श्रीशैल मामा हत्तुरे करत आहेत. प्लॉट ताब्यात देण्याची मागणी केल्यानंतर टाळाटाळ केली जात आहे. याबाबत शारदा बिराजदार, रेवनसिद्ध माळी आणि श्रीशैल मैसलगीकर यांनी आमदार सुभाष देशमुख यांच्या कडे लेखी तक्रारी निवेदन दिली आहे.
याबाबत श्रीशैल हत्तुरे यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांना प्लॉटचा ताबा देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.