सोलापूर : प्रतिनिधी
सिंधुबाई हरिबा घाडगे वय 74 राहणार आरबळी तालुका मोहोळ हिचा खून केल्याप्रकरणी गणेश मारुती माने वय 32 राहणार उंब्रज तालुका इंडी जिल्हा विजापूर यास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांनी जामीन मंजूर केला.

या हकीकत आशिकी गणेश माने व त्याचा सहकार्य विष्णू भोसले हे संगणमत करून वाघोली येथील बंद घराचे घरफोडी करून आरबळी ते बेगमपूर जाणाऱ्या कच्च्या रस्त्याच्या कडेला असलेल्या घरात चोरी करण्याच्या उद्देशाने गेले तेथे सिंधुबाई घाडगे ही एकटीच राहत होती तिच्या अंगावरील दागिने काढून घेत असताना तिने प्रतिकार केला असता तीस कोयत्याने मारून तिचा खून केला तिची कानातील फुले व गळ्यातील सोन्याची लड हे घेऊन गेले व वापरलेले हत्यार हे भीमा नदीच्या पात्रात फेकून दिले घटनेबाबतची फिर्याद मयताचा जावई परमेश्वर तुकाराम कलूबुरमे यांनी कामती पोलीस ठाण्यात दिली होती.

आपणास जामीन मिळावा म्हणून गणेश माने याने जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे जामीनासाठी अर्ज दाखल केला होता तो अर्ज न्यायालयाने खटला होता. त्यावर गणेश याने अँड. रितेश थोबडे यांचे मार्फत कोल्हापूर उच्च न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता.

अर्जाच्या सुनावणीच्या वेळी ॲड रितेश थोबडे यांनी आपले युक्तिवादात गुन्ह्यातील दोषारोप पत्रकाचे अवलोकन केले असता सदरचा गुन्हा हा परिस्थितीजन्य पुराव्यावर अवलंबून असून आरोपी विरुद्ध थेट पुरावा नसल्याचा युक्तिवाद मांडला त्यावरून न्यायधीशांनी 20,000/- रुपयाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.
यात आरोपीतर्फे ॲड रितेश थोबडे, ॲड किरण सराटे तर सरकार तर्फे ॲड एस एच यादव यांनी काम पाहिले.
