सोलापूर (प्रतिनिधी)
सोलापूर येथील श्री इंद्रभवानी देवी नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने गेल्या पंधरा दिवसांपासून नवरात्री उत्सवाचे विविध धार्मिक कार्यक्रम, पूजा-अर्चा आणि सेवा कार्य भक्तिभावाने पार पाडण्यात आले. आज मंगळवारी महोत्सवाची सांगता मोठ्या भक्तिभावात व उत्साहात करण्यात आली.
सकाळी देवीस पंचामृत स्नान घालून पूजन करण्यात आले. त्यानंतर आईच्या पालखी व नंदीध्वजासह मंदिराला पाच प्रदक्षिणा मारण्यात आल्या. देवीची महाआरती करून उपस्थित भाविकांनी दर्शन घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व नंदीध्वजाचे मानकरी, पालखीचे मानकरी, आराधी व पदाधिकारी यांना मानपान देण्यात आला.

उत्सव अध्यक्ष ब्रह्मदेव शंकर गायकवाड यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, “आपण सर्वांनी केलेली सेवा आणि मदत ही अनमोल आहे. सर्वांच्या सहकार्यामुळेच हा नवरात्र महोत्सव यशस्वीपणे पार पडला,” असे ते म्हणाले.
या प्रसंगी सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्र महोत्सव मंडळाचे अध्यक्ष तथा इंद्रभवानी नवरात्र उत्सव अध्यक्ष ब्रह्मदेव शंकर गायकवाड, तसेच लक्ष्मण गायकवाड, शिवाजी गायकवाड, सुभाष गायकवाड, गुरुनाथ गायकवाड, नागनाथ गायकवाड, शिवलिंग गायकवाड, प्रशांत इंगळे, किशोर सरवदे, शेखर वाघमारे, रोहित भोसले, दादासाहेब महेश सरवदे, गणेश भोसले, रमेश दोरकर, विजू दोरकर, रवी सरवदे, संतोष भोसले, यतिराज गायकवाड, जितू पाचंगे, गणेश सरवदे, सचिन भोसले, बाबा भोसले (DX), सूरज भोसले आदी पदाधिकारी उपस्थित होते.

नवरात्र महोत्सवाची सांगता भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडली. परिसरात दिवसभर देवीच्या जयजयकाराने धार्मिक वातावरण निर्माण झाले होते.
