सोलापूर : प्रतिनिधी
बाराव्या शतकातील महान तपस्वी, बुरुड समाजाचे दैवत व धर्मगुरू श्री केतया महाराज यांची जयंती सोलापूर येथे अत्यंत भक्तिमय आणि आनंदी वातावरणात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी बुरुड समाजातील माता-भगिनींसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात श्रींच्या विधिवत पूजनाने करण्यात आली. श्री केतया महाराज यांचे पूजन माजी नगरसेवक अनंत जाधव तसेच समाजातील महिलांच्या हस्ते करण्यात आले.
या जयंती सोहळ्यास सोलापूर शहर बुरुड समाजाचे अध्यक्ष सूर्यकांत शेंद्रे, बुरुड समाज मेसाई देवस्थानचे सल्लागार अरुण साळुंखे व पंडित वडतिले, बुरुड शक्ती नवरात्र महोत्सव ट्रस्ट मंडळाचे अध्यक्ष युवराज सुरवसे, उत्सव अध्यक्ष नितीन वडतिले व संतोष सुरवसे, सोलापूर शहर बुरुड समाज युवक संघाचे प्रमुख नवनाथ सुरवसे, तसेच बुरुड समाज श्री मेसाई देवी देवस्थान सदभक्त ट्रस्ट मंडळाचे अध्यक्ष शिवानंद वडतिले आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी विशेष आकर्षण ठरलेली सोलापूर जिल्ह्यात सध्या चर्चेचा विषय ठरलेली हत्तीवरून काढण्यात आलेली भव्य मिरवणूक. श्री केतया महाराज यांच्या जयघोषात व भक्तीमय वातावरणात ही मिरवणूक शहरातून मार्गस्थ झाली.
हा जयंती सोहळा यशस्वी करण्यासाठी महेश वाडकर, मनोज साळुंखे, अनिकेत वडतिले, रोहित वडतिले, राहुल वडतिले, किशोर वडतिले, बाळासाहेब सुरवसे, अजय वडतिले, गणेश रोहिटे तसेच बी.एम.एम. प्रतिष्ठान व बुरुड मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले.
या भव्य व भक्तिमय आयोजनाचे आयोजन बुरुड मित्र मंडळ व बी.एम.एम. प्रतिष्ठान, सोलापूर यांच्या वतीने करण्यात आले होते. संपूर्ण कार्यक्रम भक्ती, परंपरा व सामाजिक एकतेचे दर्शन घडविणारा ठरला.
