सोलापूर : प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत व हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते विजय रामचंद्र यादव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास वंदन करून तसेच राज्य गोमातेला हिरवा चारा अर्पण करत आपला इच्छुक उमेदवारी अर्ज सादर केला. त्यांच्या या उपक्रमातून सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रवादी मूल्यांचा ठळक संदेश देण्यात आला.

सोलापूर शहरातील सामान्य कुटुंबातून पुढे आलेले, पदवीधर, निर्व्यसनी व स्वच्छ चारित्र्याचे कार्यकर्ते म्हणून विजय यादव यांची ओळख आहे. 2008 ते 2025 या कालावधीत कोणतेही पद, हुद्दा किंवा वैयक्तिक लाभ न पाहता त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेशी एकनिष्ठ राहून सातत्याने पक्षकार्य केले आहे.

स्थिर राष्ट्रवाद, प्रखर हिंदुत्व आणि विकासा भिमुख विचारांवर दृढ विश्वास ठेवत त्यांनी शहरातील विविध सामाजिक, धार्मिक व संघटनात्मक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला आहे. कोणत्याही स्वार्थाशिवाय पक्षाच्या प्रत्येक उपक्रमात अग्रभागी भूमिका बजावणारा कार्यकर्ता अशी त्यांची ख्याती आहे.

परंपरा व संस्कृतीचे जतन करत बैलगाडीतून भारतीय जनता पार्टी कार्यालय, सिव्हिल सोलापूर येथे आगमन करून विजय यादव यांनी इच्छुक उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी “जय श्रीराम, जय शिवराय, जय गोमाता, भारत माता की जय” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
याप्रसंगी विविध प्रभागांतील इच्छुक उमेदवार उपस्थित होते.
प्रभाग क्रमांक १५ (ड) – विजय रामचंद्र यादव,
प्रभाग क्रमांक २५ (सर्वसाधारण महिला) – सौ. रचनाताई जयदेव सुरवसे,
प्रभाग क्रमांक १२ – सौ. पुष्पलताताई राजेंद्र गाजूल.
या कार्यक्रमास जयदेव सुरवसे, डॉ. राजेंद्र गाजूल, मल्लिकार्जुन पाटील, किरण पंगुडवाले यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते. स्वच्छ, निष्ठावंत आणि जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना योग्य संधी मिळावी, अशी अपेक्षा यावेळी कार्यकर्ते व नागरिकांनी व्यक्त केली.
