सोलापूर : प्रतिनिधी
धरमसी लाईन, प्रभाग क्रमांक ७ येथील चाळीतील महिला माता–भगिनी मोठ्या संख्येने मंगळवारी रात्री तीर्थक्षेत्र पर्यटन व दर्शनासाठी रवाना झाल्या. या तीर्थक्षेत्र पर्यटन वाहनांचे पूजन धरमसी लाईनचे मार्गदर्शक व ज्येष्ठ नेते राजन जाधव यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार प्रमुख उपस्थित होते.

आपल्या भागातील महिला माता–भगिनींना तीर्थक्षेत्र पर्यटन व दर्शनाचा लाभ मिळावा, या उदात्त हेतूने चाळीतील सामाजिक कार्यकर्ते विशाल कणसे यांनी धरमसी लाईनचे युवा नेते शंतनू साळूंके यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे सुयोग्य नियोजन केले होते.

या प्रसंगी धरमसी लाईन परिसरातील सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिला भगिनींनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

सामाजिक बांधिलकी जपत महिलांसाठी राबविण्यात आलेला हा उपक्रम सर्वत्र कौतुकास्पद ठरला असून, भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.
