सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर शहरातील पत्रा तालीम परिसरातील श्री पणजोबा गणपती मंदिराच्या सभा मंडप व परिसर सुशोभीकरणाच्या कामाचे भूमिपूजन मोठ्या भक्तीभावात व उत्साहात पार पडले. या सभा मंडप व मंदिराच्या विकासकामासाठी आमदार विजयकुमार देशमुख यांनी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे भाविकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.

या पवित्र सोहळ्यात आमदार विजयकुमार देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार तसेच पत्रा तालीमचे खलिफा पैलवान दत्तात्रय कोलारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री गणरायाची महापूजा करून विधिवत कुडाळ मारून भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी पत्रा तालीमचे प्रमुख सल्लागार शिवाजी घाडगे गुरुजी, उद्योगपती सुधीर थोबडे, नागनाथ बन्ने, भारत बन्ने, माजी उपमहापौर पद्माकर काळे, पुरुषोत्तम बरडे, श्रीकांत घाडगे, मनोज गादेकर, बापू जाधव, आनंद कोलारकर, जयवंत सलगर, हरी चौगुले यांच्यासह परिसरातील नागरिक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात श्री गणरायाच्या पूजनाने करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी मंदिर व सभा मंडप उभारणीस शुभेच्छा देत, अशा धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांमुळे समाजात एकोपा, भक्ती आणि संस्कार वृद्धिंगत होतात, असे मत व्यक्त केले. श्री पणजोबा गणपती सभा मंडपामुळे परिसरातील भाविकांना भक्ती, श्रद्धा आणि सांस्कृतिक कार्यांसाठी एक हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री पणजोबा गणपती समाज मंडळ व पत्रा तालीम परिसरातील नागरिकांनी विशेष परिश्रम घेतले. भूमिपूजनानंतर उपस्थित भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी जयंत शेळके, सचिन शिंदे, सुहास कोलारकर, पिंटू भाईजी चव्हाण, अमृत भुरळे, सनी देवकते, ओंकार भुरळे, श्रीराम घाडगे, किशोर गादेकर, हर्षल बंडगर, राहुल बनसोडे, करण कोळेकर, विजू पालकृतवार, विजय कांबळे, कपिल पवार, प्रवीण जाधव, विनोद मोटे, देविदास बनसोडे, आदित्य घाडगे, बसवराज गुब्याड, सुरज भोसले, जलपेश घुले, अजय माळगे, रोहित बंडगर, गणेश भुरळे, पप्पू भुरळे, अभिषेक केरूळकर, संतोष माने, सोमनाथ बनसोडे, वैभव धोडमिसे यांच्यासह प्रभागातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
