गुप्तधन काढून देतो म्हणून फसवणूक केलेल्या गुन्ह्यातील आरोपींचा जामीन मंजूर

2 Min Read

सोलापूर : प्रतिनिधी

थोडक्यात यात हकीकत अशी की, राजू विनायक आडम यांनी तारीख ५/१०/२०२५ रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ८३७/२०२५ प्रमाणे दिलेल्या फिर्यादीवरून दि.०५/०९/२०२३ ते मार्च-२०२४ दरम्यान आरोपी नामे मोहम्मद कादर शेख व त्याचे साथीदार इम्रान, तमीम कुरेशी, आयुब रचभरे, सचिन गायकवाड, दाउद प्रठाण, लक्ष्मण वाघमारे यांनी फिर्यादीची फसवणुक करण्याचा कट करून, गुप्त धनाचा हंडा काढून देण्याचे अमिष दाखवून, काहीतरी द्रव्य पिण्यास देवून जादुटोणा केला व त्याकरीता त्यांच्याकडून वेळो वेळी रक्कम रुपये १,२६,३४,६००/-रू घेतले व फिर्यादीस काहीएक चिजवस्तू न देता फसवणुक केलेली आहे.

वगैरे मजकुराच्या फिर्यादवरून न भारतीय दंड संहिता चे कलम ४२०,४१७,४०६ व महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ चे कलम ३(२) प्रमाणे दाखल केला होता.

तसेच वरील सर्व आरोपीं विरुद्ध जेल रोड पोलीस ठाणे येथे सुद्धा गु.२.नं.५१५/२०२५ अन्वये वरील कलमाप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर आरोपींना तारीख १७/१०/२०२५ रोजी अटक करण्यात आली व मेहरबान कोर्टासमोर हजर करण्यात आले होते तेंव्हापासून सदरचे आरोपी हे न्यायालयीन कोठडीत होते.त्यानतंर आरोपी सचिन गायकवाड यांच्या वतीने ॲडव्होकेट डी.एन.भडंगे व ॲडव्होकेट एन.एन. भडंगे यांच्यामार्फत जामीन अर्ज ठेवण्यात आला होता त्यामध्ये मे.कोर्टासमोर, जामीन हा नियम आहे तुरुंग हा अपवाद आहे व केवळ आरोप गंभीर आहेत म्हणून जामीन नकारनेयोग्य नाही तसेच आरोपी दोषी ठरेपर्यंत तो निर्दोष मानला जातो तपास पूर्ण झाल्यानंतर कोठडी आवश्यक राहत नाही अशा प्रकारचे नामदार सुप्रीम कोर्ट दिल्ली यांचे निवाडे आरोपींना जामीन मिळण्याकरता मेहरबान कोर्टासमोर आरोपीच्या वतीने सादर करून आरोपींना जामीन देण्यात यावा असा युक्तिवाद ॲडव्होकेट भडंगे यांच्यामार्फत करण्यात आला.

मेहरबान कोर्टानी सदरचा व्यक्तिवाद ग्रहमानुन आरोपीला रक्कम रुपये २०,०००/- इतक्या रकमेच्या जामीनावर आरोपी गायकवाड यांची मुक्तता मे.ज्युडीशियल मॅझिस्ट्रेट वर्ग एक श्रीमती व्हि.ए.कुलकर्णी मॅडम यांनी ता.१७/१/२०२६ रोजी केली यात आरोपीच्या वतीने ॲड‌.डी.एन.भडंगे, ॲड.एन.एन.भडंगे, ॲड.योगेश.पवार, ॲड.दिपाली.गायकवाड, ॲड.झेबा.सय्यद. व वसिम शेख यांनी पाहिले

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!