
सोलापूर : प्रतिनिधी
लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान सुरू आहे. लोकशाहीचा उत्सव समजल्या जाणाऱ्या या निवडणुकीसाठी लोक मोठ्या प्रमाणात मतदान करायला घराबाहेर पडले असताना सोलापूर जिल्ह्यात मात्र याला गालबोट लागले. सोलापूर मतदारसंघातील सांगोला येथे एका तरुणाने EVM मशीन पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. यामुळे मतदान केंद्रावर गोंधळ उडाला आणि काही काळ मतदान प्रक्रिया बंद ठेवावी लागली.
माढा लोकसभा मतदारसंघ अंतर्गत सांगोला मतदान केंद्र क्रमांक 86 बागलवाडी येथे एका मतदाराने मतदान करत असताना ईव्हीएम मशीन जाळण्याचा प्रयत्न केला. त्या पार्श्वभूमीवर त्या मतदान केंद्रावरील मशीन बदलून नवीन मशीन वर मतदान प्रक्रिया सुरळीत केली असल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी तथा 43 माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मोनिकासिंह ठाकुर यांनी दिली.
Nice report and editing.Thanks for latest update news.Ek maratha lakh maratha.
Thanks dada.