लाच घेतल्याप्रकरणी सिव्हिल हॉस्पिटलमधील कर्मचारी निर्दोष

सोलापूर : प्रतिनिधी
तक्रारदाराकडून लाचेची मागणी करून ती स्वीकारल्या प्रकरणी दिनेश बद्धा जाधव, राहणार सोलापूर याचेवर भरलेले खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश आर एन पांढरे यांच्या समोर होऊन त्यांनी गुन्हा शाबीत न झाल्याने आरोपीचे निर्दोष मुक्तता केली.
यात हकीकत अशी की, यातील तक्रारदार महेश कोल्हे यास राज्य परिवहन महामंडळात नोकरी मिळाली होती. नोकरी करिता वैद्यकीय तपासणी करण्यासाठी परिवहन महामंडळाने त्यास कळविले होते. त्याप्रमाणे त्याने आवश्यक ती कागदपत्रे घेऊन तो सिविल हॉस्पिटल येथे गेला होता. 12 सप्टेंबर 2014 रोजी तक्रारदार कोल्हे याचे वैद्यकीय प्रमाणपत्र देणे करिता आरोपीने पाचशे रुपयांच्या लाचेची मागणी केली, त्यावर तक्रारदार कोल्हे यांनी लाचलुजपत प्रतिबंधक कार्यालयाशी संपर्क साधला. त्यावरून सिव्हिल हॉस्पिटल येथे पोलिसांनी सापळा रचला व लाचेची रक्कम स्वीकारताना पोलिसांनी आरोपीस रंगेहात पकडले, अशा आशयाची फिर्याद पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात दिली होती. सदर गुन्ह्याचा तपास करून पोलिसांनी आरोपीविरुद्ध दोषारोपपत्रक दाखल केले होते.
सदर खटल्यात सरकारतर्फे एकंदर तीन साक्षीदार तपासण्यात आले.
खटल्याच्या सुनावणीच्या वेळेस आरोपीचे वकील ऍड.विनोद सूर्यवंशी यांनी आपले युक्तीवादात, तक्रारदाराच्या सांगणे प्रमाणे त्याने त्याच्या शर्टच्या खिशातून पावडर लावलेली लाचेची रक्कम काढून आरोपीस दिली व त्यानंतर आरोपीने तक्रारदारास प्रमाणपत्र दिले व तक्रारदाराने ते त्याच्या शर्टच्या खिशात ठेवले, परंतु पंचनाम्यादरम्यान प्रमाणपत्रावर कोठेही पावडरची चकाकी लागल्याचे नमुद नाही, त्यामुळे आरोपीने लाचेची मागणी किंवा स्वीकार केला याबाबत शासंकता निर्माण होत असल्याचा युक्तिवाद मांडला, त्यावरून न्यायाधीशांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली.
यात आरोपीतर्फे ॲड विनोद सूर्यवंशी, ॲड श्रीकांत पवार, ॲड मधुकर व्हनमाने यांनी तर सरकारतर्फे ॲड शैलजा क्यातम यांनी काम पाहिले.
nice coverage