सोलापूर : प्रतिनिधी
11 जून 2024 रोजी सकाळी 11/50 वा. चे सुमारास एसटी बस स्थानक समोर, अक्कलकोट येथे यातील फिर्यादी पोलिस नाईक काशीनाथ राम सदाफुले हे श्रेणी पोसई पंडीत चव्हाण, पोलिस कॉन्स्टेबल मुजावर, राठोड सर्व नेमणुक अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे यांचे सोबत बंदोबस्त व ट्रॅफिक केसेस करत थांबले असताना विना नंबर प्लेटचे बजाज प्लाटीना मोटारसायकल मोबाईलवर बोलत जाणारे मोटारसायकल चालक अमित हिरा राठोड, रा. शिवाजीनगर तांडा, अक्कलकोट यास थांबवुन नंबर प्लेट बाबत विचारणा केली.
त्यावेळेस त्याने चिडुन जावुन मला “तु ओळखत नाही काय? मी तांड्यात राहतो. पोलीसांना मस्ती आली आहे, विनाकारण गाडी अडवितात” असे म्हणुन शिवीगाळी करत पोकॉ/1124 मुजावर यांचेशी हुज्जत घालुन दमदाटी करत त्यांचा उजवा हात पिरगाळला आहे. यातील फिर्यादी हे भांडण सोडविण्यास गेले असता त्यांचे अंगावर धावुन येवुन त्याचे शर्टाची गच्ची पकडली आहे तसेच शासकिय कर्तव्यात अडथळा आणुन त्यांना शासकिय कर्तव्यापासुन धाकाने परावृत्त करण्याचे उद्देशाने शिवीगाळी, दमदाटी करुन मारहाण केली आहे. तसेच “तुम्ही माझेवर गुन्हा दाखल केला तर मी तुमचे नावे घालुन आत्महत्या करतो” असे म्हणुन दमदाटी केली आहे म्हणुन अमित हिरा राठोड, रा.शिवाजीनगर तांडा, अक्कलकोट याचे विरुध्द सरकार तर्फे फिर्याद दिली आहे.