ॲड. शकील नाईकवाडी यांच्यावर हल्ला, न्यायालयीन कामकाजापासून वकील राहणार अलिप्त, 307 कलम वाढीसाठी पोलीस आयुक्तांकडे करणार मागणी

सोलापूर : प्रतिनिधी
ॲड. शकील नाईकवाडी यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ला झाल्याने बार असोसिएशनच्या हॉलमध्ये सर्वसाधारण सभा घेण्यात आली. सदर सभेत बारचे अध्यक्ष ॲड. अमित आळंगे यांनी सुरुवातीस घटना व त्यानंतर घेतलेल्या भेटीचे विस्तृत माहिती दिली.
तदनंतर आपल्या बारचे सदस्य ॲड.रियाज शेख, ॲड.सुरेश गायकवाड, ॲड.अशोक जालादी, ॲड.परवेझ ढालायत, ॲड.संतोषकुमार बाराचारे, ॲड.संतोष न्हावकर, ॲड.विद्यावंत पांढरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी बारचे बहुसंख्य सदस्य उपस्थित होते. शेवटी सभेत ठरल्याप्रमाणे खालील प्रमाणे ठराव मंजूर करण्यात आले.
१) ॲड. शकील नाईकवाडी यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा निषेध.
२) ॲड. शकील नाईकवाडी यांना मारहाण केलेल्या आरोपींना लावलेल्या कलमात वाढ करून कलम 307 लावणे व तसे निवेदन पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना देणे.
३) उद्या दिनांक २९ जून २०२४ रोजी सोलापूर जिल्ह्यातील वकिलांनी कोर्ट कामकाजापासून अलिप्त राहणे.
४) ॲड. शकील नाईकवाडी यांना झालेल्या मारहाणीमुळे दाखल गुन्ह्यात सोलापूर जिल्ह्यातील कोणत्याही वकिलांनी त्या आरोपींचे वकीलपत्र न घेणे.
यावेळी सोलापूर बार असोसिएशन अध्यक्ष ॲड.अमित आळंगे, उपाध्यक्ष ॲड.व्ही.पी.शिंदे, सचिव ॲड.मनोज नागेश पामूल, सहसचिव ॲड.निदा सैफन, खजिनदार ॲड.विनयकुमार कटारे यांच्यासह ज्येष्ठ आणि युवा वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.