जिल्हाप्रमुखानी आरोग्यमंत्र्यांनवर टीका करत दिला घरचा आहेर, मनीष काळजे यांची तानाजी सावंतांवर घनाघाती टीका
आरोग्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या बोटीत बसून बोटीला भोक पाडण्याचे काम करू नये : मनीष काळजे

सोलापूर : प्रतिनिधी
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची पुतणे व लवंगी साखर कारखान्याचे चेअरमन अनिल सावंत यांनी शरद पवार यांची भेट घेऊन माझ्यासह आरोग्यमंत्र्यांना घेऊन येतो असे आश्वासन देत शरद पवारांची भेट घेतली तशा आशयाच्या बातम्या प्रसार माध्यमातून दिल्या शिवाय त्यांचे दुसरे पुतणे धनंजय सावंत यांनी धाराशिव मतदार संघातून आम्हाला उमेदवारी नाही मिळाली तर वेगळा विचार करावा लागेल असा इशारा थेट संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला हा प्रकार म्हणजे बोटीत बसून बोटीला भोक पाडण्याचा प्रकार असून अशी दुटप्पी भूमिका तानाजी सावंत यांनी सोडावी अन्यथा निष्ठावंत सैनिक त्यांना त्यांची जागा दाखवेल असा इशारा सोलापूर शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी दिला आहे.
या भूमिकेला सोलापूर जिल्ह्यातील सर्व जिल्हाप्रमुख व पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला असून लवकरच एक शिष्टमंडळ हे मुख्यमंत्र्यांना भेटून सविस्तर माहिती देणार आहे
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची पुणे अनिल सावंत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन आपण आदेश दिला तर पंढरपूर विधानसभा राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढू असे स्वतः पवारांची गाठ घेऊन सांगितले यावर शरद पवार यांनी तुम्ही राष्ट्रवादीत आला तर आरोग्यमंत्र्याची अडचण होईल असा प्रश्न त्यांना विचारला असता मी आरोग्यमंत्र्यांना विचारून तुमच्याकडे आलो आहे असे विधान करून शिवसैनिकात संभ्रम तयार केला आहे.
याबाबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, की याबाबत सविस्तर अहवाल शिवसेनेचे सचिव संजय मशीलकर यांना दिला आहे. मशीलकर यांनी हा विषय मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार असल्याचे सांगितले. सोलापूर जिल्ह्यातील शिवसैनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो आदेश देतील तो प्रमाण म्हणून सोलापूर जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक काम करणार आहेत. सावंत कुटुंबातील कुठलाही व्यक्ती राष्ट्रवादीत गेला तरी त्याचा परिणाम शिवसेनेवर होणार नाही. जिल्ह्यात शिवसेना मजबूत आहे. शिवसेना पक्षाच्या विरोधात सावंत कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीने भूमिका व्यक्त केली तर ती शिवसेनेची भूमिका होत नाही. असे ही मनिष काळजे म्हणाले.
आरोग्यमंत्र्यांनी आपल्या पुतण्यांना आवरावे किंवा याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी सोलापूर जिल्ह्यातील शिवसैनिक करत आहेत.