सोलापूरमनोरंजनमहाराष्ट्रराजकीयसामाजिक
अभिनेत्री अमिता कुलकर्णी आणि गीतांजली गणगे सोलापूरला येणार, राठोड-चव्हाण यांनी ढोलिडा भव्य दांडिया महोत्सव 2024 चे केले आयोजन

सोलापूर : प्रतिनिधी
शारदीय नवरात्रोत्सवनिमित्त बनशंकरी मध्यवर्ती नवरात्र महोत्सव मंडळ सोनाई फाऊंडेशन व रुक्माई प्रतिष्ठान सोलापूर समर्थ ईलेक्ट्रॉनिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने ढोलिडा भव्य दांडिया महोत्सव 2024 चे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवारी 7 ऑक्टोबर सायंकाळी सहा ते दहा या दरम्यान टाकळीकर मंगल कार्यालय या ठिकाणी या उत्सवाचे आयोजन होत आहे. या दांडीया उत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे प्रेमास रंग यावे यामधील अभिनेत्री प्रमिला कुलकर्णी व अग बाई सुनबाई यामधील अभिनेत्री गीतांजली गणगे यांच्या आहे.
या उत्सवात लाखो रुपयांची पारितोषिके ठेवण्यात आली असून सहभागी स्पर्धकांना गिफ्ट देण्यात येणार आहे. महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सोनाई फाऊंडेशनचे अध्यक्ष युवराज राठोड आणि रुक्मिणी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन चव्हाण यांनी केले आहे.