लोंढे काळे कदम गुमटे थोरात सह इतर आरोपी फरार, पोलिस आयुक्त साहेब माझ्या मुलाचा खूण केला हो, अथर्व च्या वडिलांनी फोडला टाहो

सोलापूर : प्रतिनिधी
विजापुर नाका पोलीस स्टेशन हद्दित पैशाचे देण्या घेण्याच्या व्यवहारावरून अथर्व दिनेश जाधव, वय 19 वर्ष, रा.03, सरस्वती बिल्डींग, अमृत नगर, विजापूर रोड, सोलापूर यास आठ ते दहा जणांनी मिळून बेदम मारहाण केली या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला त्याच उपचारासाठी अश्विनी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले परंतु उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला.
फिर्यादी दिनेश प्रकाश जाधव, वय 50 वर्ष, व्यवसाय-खाजगी नोकरी, रा.03, सरस्वती बिल्डींग, अमृत नगर, विजापूर रोड, सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विजापुर नाका पोलीस स्टेशन सोलापुर शहर गुरनं 447/2024 BNS 103(1), 189(2),189(4),191(1),191(2),191(3),190,324(3) (4),352,351(2) (3), आर्म अॅक्ट कलम 4/25, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.
यात हकिकत अशी की, दि.04/10/2024 रोजीचे संध्याकाळी 06.15 वा. चे पुर्वी पासुन ते दि 5/10/2024 रोजीचे 01/30 वा दरम्याण इंडियन मॉडेल इंटरनॅशनल शाळेच्या पाठीमागे, रेणुका नगर येथील मोकळ्या मैदानात व तेथेच असणाऱ्या एका पत्र्याचे शेडमध्ये सोलापूर ते आश्विनी हॉस्पीटल सोलापुर या दरम्याण, माझा मुलगा अथर्व दिनेश जाधव, वय 19 वर्ष, रा.03, सरस्वती बिल्डींग, अमृत नगर, विजापूर रोड, सोलापूर यास पैशाचे देण्या घेण्याच्या व्यवहारावरून, प्रसाद लोंढे, बाळू काळे, सागर कदम, केदार गुमटे, मनोज सुर्यराव ऊर्फ भाईजी, अजिंक्य शाबादे, प्रकाश शिंदे ऊर्फ बुध्दा, जॉकी थोरात, विनायक जाधव यांनी व त्याचे इतर साथीदार असे लोक तीन वेगवेगळ्या चारचाकी गाड्यामधून येवून त्यांनी सोबत आणलेल्या लाकडी काठया, लोखंडी रॉड व कोयते याने मुलगा अथर्व यास मारून गंभीर जखमी करून त्याचा खून केला आहे. तसेच त्याच्या सोबत असणारे प्रदिप मंगळवेढेकर, शिवकुमार तंबाखे, राहुल साठे, समर्थ माटे यांना मारहाण केली आहे. म्हणून माझी वरील सर्व व्यक्तींविरूध्द तक्रार दिली आहे. पुढील तपास सपोनि शितलकुमार गायकवाड हे करत आहेत.
आरोपी – १) प्रसाद लोंढे, २) बाळू काळे, ३) सागर कदम, ४) केदार गुमटे, ५) मनोज सुर्यराव ऊर्फ भाईजी, ६) अजिंक्य शाबादे, ७) प्रकाश शिंदे ऊर्फ बुध्दा, ८) जॉकी थोरात, ९) विनायक जाधव व त्याचे इतर साथीदार असा आहे.
या घटनेची माहिती मिळताच विजापुर नाका पोलीस स्टेशन येथे DCP कबाडे सो परिमंडळ, DCP काळे मँडम क्राईम, ACP गवारी सो विभाग-२, ACP माने क्राईम सोलापुर शहर, वपोनि दादा गायकवाड, पोनि दोरगे गुन्हे शाखा सोलापुर, सपोनि शितलकुमार गायकवाड, सपोनि बोधे मॅडम, पोसई पोपळभट, पोसई तरंगे, पोसई पाटील यांनी भेट दिली.