सोलापूरमनोरंजनमहाराष्ट्रशिक्षणसामाजिक
ज्युनिअर मिस इंडिया, युक्ता व्यवहारेची निवड

सोलापूर : प्रतिनिधी
ज्युनिअर मिस इंडिया ही सौंदर्य स्पर्धा पूर्ण भारतभर होत असते. या वर्षाचे ऑडिशन्स अलीकडे पुण्यात झाले. आय. एम. एस. शाळेतील विद्यार्थिनी, या स्पर्धेमध्ये वयोगट ११ ते १५ या गटामध्ये युक्ता व्यवहारे ही ऑडिशनमध्ये सिलेक्ट झाली असून अंतिम फेरीसाठी फायनलिस्ट म्हणून सिलेक्ट झाली आहे.
ही स्पर्धा संपूर्ण भारत देशामध्ये राबवली जाते. या स्पर्धेत सौंदर्याबरोबर बुद्धीचाही कस लागतो. ही स्पर्धा सौंदर्य स्पर्धेमध्ये अतिशय मानाची समजली जाते. सर्व मित्रमंडळी, नातेवाईक व शिक्षक यांच्या कडून विशेष कौतुक होत आहे.