सोलापूरआरोग्यधार्मिकमहाराष्ट्रशिक्षणशेतीसामाजिक

अबब तब्बल 6 किलोचा कोंबडा, चायनाचा बोकड, जगातील सर्वात बुटकी गाय आणि म्हैस, यंदा श्री सिध्देश्वर कृषी प्रदर्शनात विशेष आकर्षण

सोलापूर : प्रतिनिधी

श्री सिद्धेश्वर कृषी व औद्योगिक प्रशिक्षण 21 ते 25 डिसेंबर दरम्यान श्री सिद्धेश्वर कृषी 2024, सोलापूर भव्य 54 वे राज्यस्तरीय कृषी, औद्योगिक, वाहन महोत्सव व पशुपक्षी प्रदर्शन 21 डिसेंबर 2024 ते 25 डिसेंबर 2024 दरम्यान होणार आहे. स्थळ : होम मैदान, सोलापूर वेळ : सकाळी 10.00 ते रात्री 9.00 पर्यंत आहे.

श्री सिद्धेश्वर देवस्थान यांच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शन भरवत असून यंदा प्रदर्शनाचे 54 वे वर्षे आहे. या निमित्ताने होम मैदान येथे दिनांक 21 डिसेंबर 2024 ते 25 डिसेंबर 2024 या 5 दिवसाच्या कालावधीत होणाऱ्या कृषी प्रदर्शनात 300 स्टॉलचे नियोजन करण्यात आले आहे. कृषी विभाग, आत्मा, जिल्हा परिषद सोलापूर, महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या विशेष सहकार्याने व स्मार्ट एक्स्पो ग्रुप च्या व्यवस्थापन अंतर्गत भरविण्यात येत आहे. तसेच कृषी संशोधन केंद्र, सोलापूर डाळिंब संशोधन केंद्र, रब्बी ज्वारी संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, सोलापूर व मोहोळ विभाग, रेशीम खादी ग्रामोद्योग, पशुसंवर्धन, सामाजिक वनीकरण व राष्ट्रीयकृत बँका, नाबार्ड, कृषी महाविद्यालय, कृषी स्टार्टअप उद्योजक, नया उद्योजक, कृषी यांत्रिकीकरण, फळ रोपवाटिकाधारक, साखर कारखाने यांच्या सहभागाने आयोजित केले जाणार आहे.

सदर प्रदर्शन नियोजनबध्द व यशस्वीरित्या व्हावे याकरीता मागील 2 महिन्यापासून याची तयारी करण्यात येत आहे. यामध्ये प्रदर्शनाचे पूर्व तयारी म्हणून सर्व संबंधित विभागाचे दि. 30 ऑक्टोंबर, 13 नोव्हेंबर तसेच दि. 03 डिसेंबर 2024 रोजी श्री सिद्धेश्वर देवस्थान येथे अध्यक्ष मा. धर्मराज काडादी यांच्या अध्यक्षतेखाली बैठकी संपन्न झाल्या. सदर कृषी प्रदर्शनाची माहिती जिल्ह्यातील शेतकरी बांधवापर्यंत पोहचावी याकरीता आज दि. 16 डिसेंबर 2024 रोजी पत्रकार परिषदचे आयोजन करून सर्व प्रसार माध्यमांच्या सहकार्याने माहिती देण्यात येत आहे. तरी श्री सिध्देश्वर कृषी प्रदर्शनात सर्व शेतकरी बांधव, उद्योजक व नागरिकांनी सहभागी होवून कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे सर्व नागरिकांना श्री. सिध्देश्वर यात्रा समिती आवाहन करीत आहे.

1) शेतकऱ्यांना शेतातील नवीन तंत्रज्ञानाची माहिती, कृषी यांत्रिकीकरण, दुग्धोत्पादन, रेशीम पीक, मधुमिक्षका पालन, फलोत्पादन तसेच कृषी उद्योजक निविष्ठा, नवीन स्टार्टअप व्हर्टिकल फार्मिंग, आधुनिक कृषी अवजारे इत्यादी विषयी सविस्तर माहिती पोहचण्यास सुलभ होईल.

2) या कृषी प्रदर्शनामध्ये सोलापूरचे शान असलेली खिलार बैल व गाय प्रदर्शित केले जाणार आहेत. तसेच जगातील अत्यंत दुर्मिळ बुटकी देशी पुंगनूर जातीचे गायी प्रदर्शित केले जाणार आहेत. याकरीता इस्ट गोदावरी आंध्र प्रदेशातून शेतकरी सहभागी होणार आहेत.

3) तामिळनाडू, वेल्लोर, सेलम तसेच महाराष्ट्रातील सोलापूर, नाशिक, पुणे बाएफ संस्था यांचेकडील शेतकऱ्यांनी स्वतः तयार केलेले अंदाजे 500 प्रकारचे दुर्मिळ देशी बी-बियाणे प्रदर्शित करणार आहेत. तसेच शेतकऱ्यांना विक्रीसाठीही उपलब्ध असणार आहेत.

4) दिनांक 22 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 पर्यंत कॅट शो व डॉग शो प्रदर्शन होणार असून यावेळी विजेत्यांना पारितोषिके देण्यात येणार आहेत. सकाळी 10.00 ते दुपारी 4.00 पर्यंत डॉग शो, दुपारी 4.00 ते सायंकाळी 6.00 पर्यंत कॅट शो, सायंकळी 6.00 वाजता डॉग अॅन्ड कॅट फॅन्सी ड्रेस स्पर्धा

5) दिनांक 23 डिसेंबर 2024 राज्यस्तरीय देशी गाय, बैल प्रदर्शन स्पर्धा आयोजन व विजेत्यांना पारितोषिके देण्यात येणार आहेत.

6) तसेच दिनांक 23 डिसेंबर 2024 रोजी पुष्प प्रदर्शना (फुलांचे प्रदर्शन) चे आयोजन.

7) औद्योगिक प्रदर्शनः सोलापूर जिल्ह्यामधीला कृषि व संलग्न, गारमेंट, टेक्सटाईल, टॉवेल इत्यादी उत्पादित मालाचे प्रदर्शनाचे आयोजन,

प्रदर्शनाचे आकर्षण

जगातील सर्वात दुर्मिळ बुटकी पुंगनूर गाय, जगातील सर्वात बुटकी म्हैस (राधा), खास चायनाहून आणलेला चायनाचा बोकड, तब्बल 6 किलो वजनाचा कोंबडा, 300 हून अधिक शेतीविषयक कंपन्यांचा सहभाग, लाखो शेतकरी बांधवांची उपस्थिती, गारगेंट तसेब टेक्सटाईल विभागाची दालने, भारतातील विविध कंपन्यांचे ट्रॅक्टर्स व शेती अवजारे, वाहन महोत्सव, शेतीविषयक प्रक्रिया उद्योग, महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या, शेतकऱ्यासाठीच्या सर्व योजनांची माहिती देणारी दालने, सेंद्रीय शेतीचे विशेष दालन, पशु पक्षी प्रदर्शन, पुष्प प्रदर्शन, 500 हून दुर्मिळ देशी बियाण्यांचे प्रदर्शन व विक्री, 500 हून अधिक दुर्मिळ तांदळाचे बियाणे, तांदूळ महोत्सव, शेतीविषयक पुस्तक प्रदर्शन, फक्त दहा मिनिटांमध्ये एक एकर क्षेत्राची फवारणी करणारे रिमोट ऑपरेटेड ड्रोनचे लाईव्ह प्रात्यक्षिक व शेतकरी बांधवांना फवारणी क्षेत्रातील नवीन उद्योग करण्यासाठी उपयुक्त असा ड्रोन चे दालन, शेतीमधील विविध तंत्रज्ञानाची माहिती देणारी दालने आहेत. अशी माहिती सिद्धेश्वर कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!