पालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या हस्ते विशेष स्वच्छता मोहिमेमध्ये उत्कृष्ट काम केलेल्या अधिकारी कर्मचा-यांचा केला सत्कार

4 Min Read

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर महानगरपलिकेच्या वतीने ०२ डिसेंबर, २०२४ ते १९ डिसेंबर, २०२४ या कालावधीमध्ये आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या आदेशानुसार विशेष स्वच्छता मोहीम शहरातील सर्व मुख्य रस्ते व भागात ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये म.न.पा.कडील जवळपास ४५० अधिकारी, कर्मचारी सोबत मनपाचे यंत्रणा जसे की JCB, डंपर, घंटागाड्या, जेटींग वाहन, ट्रॅक्टर वॉशींन वाहन, इत्यादी यांनी योगदान दिले. शहरातील ११७ रस्त्यांची स्वच्छता झाडलोट, डिव्हाडर लगत व फुटपाथ लगत साचलेली माती काढणे, डिव्हाडर मधील कचरा काढणे, डिव्हाडर मधील वाढलेली झाडे छाटणी करणे इत्यादी कामे म.न.पा.चं सर्व विभागाच्या समन्वयातून पहिल्यांदा अशी स्वच्छता मोहीम मोठ्या प्रमाणात घेतली असून या मुळे सोलापूर शहरातील चेहरा मोहरा बदलला असून अशीच स्वच्छता मोहम पुढेही राबविण्यात येईल असे महापालिकेचे आयुक्त शीतल तेली-उगले यांनी या कार्यक्रमाप्रसंगी म्हाणाल्या व शहरातील नागरिकांच्या जीवनमान उंचविण्याबाबत प्रयत्न करू असेही म्हणाल्या.

आयुक्त शीतल तेली-उगले यांनी सोलापूर शहरास स्वच्छ सर्वेक्षणमध्ये ६३ वा गुणांकन, ODF++ मानांकन आणि कचरामुक्त ३ स्टार मानांकन वाढविण्यासाठी अधिक प्रयत्न करू अशी ग्वाही दिली. तसेच इंदौर शहराच्या स्वच्छतेचे व परदेशातील शहरांचे उदाहरण देऊन उपस्थित कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवले. या वेळी आयुक्त यांनी या महिमेमध्ये सहभाग झालेले सर्व विभागाचे मोहीम यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन व मार्गदर्शन केले.

विशेष स्वच्छता मोहिम गौरव समारंभ हा कार्यक्रम हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयोजित करणेत आला. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या वेळी तज्ञ परीक्षक किरण बनसोडे (अध्यक्ष,महापालिका पत्रकार संघ), तज्ञ परीक्षक मोहन बाबुराव चव्हाण (प्राध्यापक, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय), तज्ञ परीक्षक बाळासाहेब भास्कर (प्राध्यापक, भाई छन्नुसिंह चंदेले समाजकार्य महाविद्यालय) या तिन्ही तज्ञ परीक्षकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या तीन तज्ञ परिक्षक यांनी निवड केलेल्या गुणांक जाहीर करण्यात आले. त्या मध्ये प्रथम क्रमांकावर विभागीय कार्यालय क्र.१, द्वितीय क्रमांकावर विभागीय कार्यालय क्र. ७ व तृतीय क्रमांक विभागीय कार्यालय क्र. २ आणि ४ मध्ये विभागून देण्यात आले तसेच या सोबत उद्यान अधिक्षक किरण जगदाळे, अतिक्रमण अधिकारी हेमंत डोंगरे व त्यांचे कर्मचारी यांना ही प्रमाणपत्र देण्यात आले.

या मध्ये विभागीय अधिकारी, कनिष्ठ अभियंता, मुख्य आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, मजूर, बिगारी व झाडूवाला, झाडूवाली असे कर्मचा-यांचा आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या हस्ते प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन सत्कार करणेत आला. आयुक्त शीतल तेली-उगले यांचे मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त आयुक्त रवि पवार यांचे संकल्पनेतून सर्व विभागाचे संयुक्त सहकार्याने हि मोहीम अत्यंत यशस्वीपणे राबविण्यात आली.

या गौरव सभारंभास अतिरिक्त आयुक्त रवि पवार यांनी त्यांचे अनुभव व्यक्त केले व मोहिमेचा उद्देश प्रस्तावनेमध्ये नमूद केले व मोहीम यशस्वीपणे राबविणा-या अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक केले. या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त रवि पवार, मा. अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, उपायुक्त तैमुर मुलाणी, मुख्य लेखा परीक्षक रुपाली कोळी,

उपसंचालक मनीष भीश्नुरकर, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित, सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील, सहाय्यक आयुक्त मनीषा मगर, सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे, अंतर्गत लेखापरीक्षक राहुल कुलकर्णी, कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी ओमप्रकाश वाघमारे, सर्व विभागीय अधिकारी, सर्व मुख्य सफाई अधिक्षक नागनाथ बिराजदार, सफाई अधिक्षक अनिल चराटे, सर्व मुख्य आरोग्य निरीक्षक व आरोग्य निरीक्षक व मोठ्या संख्येने कर्मचारी व बचत गटाचे अध्यक्ष आदी उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!