सोलापूरआरोग्यमहाराष्ट्रराजकीयसामाजिक
डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने अजितदादांचा सत्कार
संस्थापक अध्यक्ष राज माने यांच्या नेतृत्वा खालील शिष्टमंडळाची भेट

सोलापूर : प्रतिनिधी (मुंबई)
डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व श्री विठ्ठल रुक्मिणींची मूर्ती भेट देवून सत्कार करण्यात आला.
संघटनेचे राजा माने, राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत, मुंबई अध्यक्ष संजय भैरे व राज्य कार्यकारिणी सदस्य दिपक नलावडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी भेट घेतली.
पत्रकार सन्मान योजना मानथन वाढ, डिजिटल मिडियाच्या विविध समस्या आणि पत्रकार अथिस्वीकृती तसेच पत्रकार पेन्शन योजना नियमावली संदर्भातील प्रश्नी लक्ष घातल्याबद्दल अजितदादांचे आभार मानले.