नवीन वर्षाचे स्वागत आनंदात करा पण कायद्याचं उल्लंघन केल्यास कारवाई होणार : सुधीर खिरडकर

सोलापूर : प्रतिनिधी
नवीन वर्षाच्या आगमना निमित्त सोलापूर शहरात पोलीस आयुक्तालयाच्या वतीने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. वाहतूक शाखेचे एक सहाय्यक पोलीस आयुक्त, एक पोलीस निरीक्षक, नऊ अधिकारी आणि 95 कर्मचारी रस्त्यावर असणार आहेत. प्रत्येक पोलीस स्टेशनला दहा कर्मचारी बंदोबस्त साठी दिले आहेत. शहरांमध्ये तेरा ठिकाणी ट्रॅफिकचे नाकाबंदीचे पॉइंट असणार आहेत.
नववर्षाचे स्वागत करताना रस्त्यावर इतर जनतेला त्रास होणार नाही याची काळजी घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. ड्रिंक अँड ड्राईव्हची कारवाई मागील चार दिवसापासून सोलापूर शहराच्या हद्दीत सुरू आहे. चार दिवसात जवळपास 30 लोकांवर ड्रंक अँड ड्राईव्ह चे केसेस केलेले आहेत. सोलापूर शहरातील नागरिकांनी नवीन वर्षाचे स्वागत करताना कोठेही कोणत्याही स्वरूपात कायद्याचे उल्लंघन होऊ नये याची काळजी घ्यावी. कायद्याचे उल्लंघन केल्यास नक्की कारवाई होणार असा इशाराच सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खिरडकर यांनी दिली.