पुणे अखंड मराठा समाज पदाधिकाऱ्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन दिले निवेदन, SEBC आणि EWS चा मांडला प्रश्न

सोलापूर : प्रतिनिधी (पुणे)
अखंड मराठा समाज महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हाच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्तीसाठी शिष्यवृत्ती लागू करण्यासंदर्भात आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची पुण्यात भेट घेऊन निवेदन दिले. त्यावर सदर मागणीच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन सविस्तर चर्चा करण्यासंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी शिष्टमंडळाला आश्वस्त केले.
अखंड मराठा समाज पुणे महाराष्ट्र राज्य ही एक संघटना आहे. या संघटनेने अनेकवेळा आंदोलन, निषेध मोर्चे, निदर्शने काढले आहेत. सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (SEBC) विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्तीसाठी शिष्यवृत्ती उपलब्ध आहे. महाराष्ट्र सरकारच्या कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाच्या माध्यमातून SEBC आणि EWS विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीअंतर्गत निवडलेल्या विद्यार्थ्यांना 100 टक्के कोर्स फी प्रतिपूर्ती मिळते.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्तीसाठी शिष्यवृत्ती लागू करण्यासंदर्भात अखंड मराठा समाज महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हाच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने पुढाकार घेत मंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन दिले.