सोलापूर युवक काँग्रेस आयोजित रामवाडी शिवजन्मोत्सव कब्बड्डी स्पर्धा थाटात उदघाटन

सोलापूर : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सोलापूर शहर युवक काँग्रेस व गणेश डोंगरे मित्र परिवार वतीने 14 ते 16 फेब्रुवारी रोजी महानगरपालिका शाळा मैदान, रामवाडी येथे सोलापूर जिल्हा कब्बड्डी खुला गट पुरुष,महिला व किशोर किशोरी मुले मुली 55 किलो वजनी गट स्पर्धचे उदघाटन 14 फेब्रुवारी रोजी
सायंकाळी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवार, प्र कुलगुरु डॉ लक्ष्मीकांत दामा, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश पवार, सोलापूर विद्यापीठ राष्ट्रिय सेवा योजना संचालक डॉ राजेंद्र वडजे,विद्यार्थी कल्याण मंडळ संचालक डॉ केदारनाथ काळवणे,नगरसेवक विनोद भोसले,प्रा गणेश संकपाळ, जिल्हा कब्बड्डी अससोसिएशन कार्यवाह मदन गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.
आयोजक युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांनी प्रास्तविक भाषण व स्वागत केले
सोलापूर विद्यापीठ कुलगुरू डॉ प्रकाश महानवार आपल्या मनोगतात म्हणाले आयोजकांनी कब्बडी स्पर्धा चांगले नियोजन या ठिकाणी केले आहे.
विदयापीठात आता खेळाडूसाठी येणाऱ्या सहा महिन्यात मोठे क्रीडा संकुल काम पुर्ण होत आहे.राष्ट्रीय खेळाडूंना स्पर्धासाठी विद्यापीठ अर्थीक मदत यावर्षी पासून चालू केले आहे.जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धा आहेत. परंतु या स्पर्धा राज्यस्तरिय असल्यासारखे वाटत आहेत.असेही ते म्हणाले.