
सोलापूर : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार तथा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार शिवजयंतीच्या निमित्ताने संपूर्ण राज्यभर दिनांक 19 ते 27 फेब्रुवारी दरम्यान स्वराज्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आठवडाभर शिवराय केंद्रित विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या रयतेचे राज्य व त्यामधील संकल्पना लोकांसमोर मांडणं हा उद्देश आहे.
महाराष्ट्राची अस्मिता आणि स्वाभिमान यांच्याशी आपला पक्ष जोडला गेला पाहिजे ही संकल्पना आहे. दरम्यान स्वराज्य सप्ताहाच्या अंतर्गत इच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या वतीनं विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये मंगळवारी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला प्रभाग क्रमांक 22 येथील सोलापूर महानगरपालिका रामवाडी यूपीसी सेंटर मधील महिला आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आजच्या नव्या पिढीला माहीत असणे आवश्यक आहे शिवरायांनी शेतकरी हित, महिलांचा सन्मान सांभाळत सामाजिक हित जोपासले छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण करत असताना आजच्या बाल आणि युवा पिढीत शिवरायांचे विचार भिनवून तळागाळात पोहोचवण्याच्या उद्देशाने प्रभाग 22 येथे शिवचरित्र व्याख्याते प्राध्यापक सुहास जाधव आणि प्राध्यापक सचिन चटके यांचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
उत्सव शिवजन्मांचा, स्वराज्य कार्याचा या अंतर्गत प्रभाग 22 येथील अण्णासाहेब पाटील प्रशाला जवळील भूषण नगर हनुमान मंदिर शेजारी सोलापूर महानगरपालिका लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरिक वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून 17 लाख 82 हजार 281 लाख रुपये खर्चित रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ आणि व्याख्यानाचे आयोजन करण्यात आला.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, महिला कार्याध्यक्ष चित्रा कदम, दत्ता होसमनी, संतोष गायकवाड, भंडारे मामा, अश्विनी जाधव, मीराताई विटेकर, मनीषा शिवशरण, रिना गायकवाड, पुनम जाधव,रेखा गायकवाड, तनुजा जाधव, आदींची उपस्थिती होती.
आयोजित स्वराज्य सप्ताहाच्या कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार तथा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली स्वराज्य सप्ताह निमित्ताने राज्यभर विविध उपक्रम राबविले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून इच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या वतीनं प्रभाग क्रमांक 22 येथे आरोग्य विभागातील आशा वर्कर, परिचारिका महिला डॉक्टर यांचा सन्मान करण्यात आला तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आजच्या नव्या पिढीला माहीत व्हावे या उद्देशाने शिवचरित्र व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले त्याचप्रमाणे प्रभागातील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने रस्ता काँक्रिटीकरण कामाचे शुभारंभ देखील या निमित्ताने करण्यात आले युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पक्षाच्या वतीने स्वराज्य सप्ताह साजरा करण्यात येत आहे महाराष्ट्राचे अस्मिता आणि स्वाभिमान यांच्याशी आपला पक्ष जोडला गेला पाहिजे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस हा शिवरायांच्या रयतेचे राज्य या संकल्पनेतून शासन चालवण्याची प्रेरणा घेतो हा उद्देश लोकांसमोर या निमित्ताने ठेवण्यात आला आहे यामुळे स्वराज्य सप्ताहाच्या निमित्ताने छत्रपती शिवरायांच्या विचारांचा जागर होणार असल्याचेही ते म्हणाले. स्वराज्य सप्ताह निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये इच्छा भगवंताची मित्रपरिवार मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचेही यावेळी किसन जाधव म्हणाले.
याप्रसंगी प्रभागातील नागरिक शांताबाई कांबळे, सुनीता घोलप, लता घोलप, चायमा हत्ती, सुजाता टिळे, इंदुबाई टिळे, पार्वतीबाई कट्टीमनी, शांताबाई कोमल, हनुमंत ताई भंडारे, महादेवी दत्ता ओसमनी, देवेंद्र पारट, कृष्णा आनंद, बजरंग भंडारे, निसार शेख सिद्धराम मामा हेमगड्डी,दिनेश चलवादी, मीनाक्षीताई चालवादि ,रमेश चलवादी आदींची उपस्थितीहोती तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संगीता गायकवाड, सरोजिनीताई जाधव,शोभाताई गायकवाड ,रुक्मिणीताई जाधव, लक्ष्मी पवार, बिराजदार मावशी, अमोल जगताप, किरण शिंदे, ऋषी येवले ,माऊली जरग ,माणिक कांबळे ,वसंत कांबळे, महादेव राठोड आदींनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश लामखाने यांनी केले तर आभार दिनेश चलवादी यांनी मानले.