सोलापूर : प्रतिनिधी
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या संकल्पनेतून शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार व कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या सूचनानुसार शहरात स्वराज्य सप्ताह निमित्त विविध कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आले आहे. त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक काँग्रेस आयोजक प्रदेश सचिव महेश कुलकर्णी विविध ग्रंथालयांना शिव विचार मनामनात शिव विचार घराघरात पोहोचवण्यासाठी शिव विचारांचे पुस्तक भेट स्वरूपात देण्यात आले.
यामध्ये नागरबाई सिद्धगवडा वाचनालय, लक्ष्मी माता सार्वजनिक वाचनालय, हुतात्मा सार्वजनिक वाचनालय, देगाव सार्वजनिक वाचनालय, शेर शिवाजी वाचनालय, सिंगल माता सार्वजनिक वाचनालय, राघवेंद्र सार्वजनिक वाचनालय, बंडगर सर्वजनिक वाचनालय, या वाचनालयांना पुस्तक भेट देण्यात आले.
व्यासपीठावर शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, युवक अध्यक्ष सुहास कदम, संघटक दत्तात्रय बडगंची, प्रदेश उपाध्यक्ष साजिद पटेल, सहकार सेल अध्यक्ष भास्कर आडकी, युवती विभाग अध्यक्ष किरण माशाळकर, दक्षिण विधानसभा अध्यक्ष श्रीकांत वाघमारे, कार्याध्यक्ष प्रदीप बाळशंकर, महिला आघाडी सरचिटणीस सुरेखा घाडगे, दत्ता बनसोडे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. आयोजक महेश कुलकर्णी यांच्या या स्तुत्य उपक्रमांचा शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी विशेष कौतुक केल.
यावेळी विविध ग्रंथालयांचे अध्यक्ष कुंडलिक मोरे, जयंत आराध्य, प्रवीण लबडे, नंदू नवगिरे, वृषाली हजारे, राजश्री माशाळकर, सोनल पिंगळे, मारुती पाथरूट, अंकुश लोहार, धोंडीबा बंडगर, यांच्यासह विविध ग्रंथांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.