छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव निमित्त आस्था फाउंडेशनच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम घेऊन केली साजरी
आस्था फाऊंडेशनच्या आस्था रोटी बँकेच्या वतीने मुकबधीर विदयार्थांन्या शालेय साहित्य वाटप व मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू ऑपरेशन शिबीर

सोलापूर : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या जयंतीनिमित्ताने प्र.6 अ येथील दमाणी नगर मुकबधीर शाळेत व सिध्देश्वर नगर येथे कामगार संख्या जास्त आहे. तेथे मोफत नेत्र तपासणी शिबीर घेऊन व शिबीरात मोतीबिंदु आढळलेल्या रुग्णांना आस्थाच्या वतीने मोफत आॕपरेशन करुन शस्त्रक्रिया करुन दिली जाणार आहे. अश्या आगळया वेगवेगळ्या पध्दतीने शिवजयंती साजरी करण्यात आली.
देवाने प्रत्येकांना परिपुर्ण नाही बनवल कुठे ना कुठ काही ना काही कमी राहतेच तसेच हया दिव्यांगांच्या बाबतीत दिसायला जरी ते तुमच्या आपल्या सारखे असले तरीही त्यांना ऐकता येत नाही तर काहींना बोलता येत नाही हा देखील घटक समाजपयोगी आहे. अनेकोनेक मोठ मोठे उदाहरण आहेत जे दिव्यांग असूनही नावलौकिक केलेले आहेत. अश्या मुलांना शिवजयंती निमित्याने दोन प्रेरणादायक गोष्टींमधून काही शिकता यावे यांनाही आनंद वाटावा की आपण आपले पालक मित्रवर्ग व शिक्षक हयांच्या ही व्यतिरिक्त संवाद साधू शकतो हा आत्मविश्वास वाटावा हा आस्थाचा छोटासा प्रयत्न.
हया कार्यक्रमासाठी प्रमुख पावणे उपस्थिती होती. जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी अभियंता संजय धनशेट्टी, संस्थेचे मार्गदर्शक राजु हौशेट्टी, सुरज रघोजी, प्रशालेच्या मुख्याध्यापिका क्षितीजा गाथाडे प्रथम मान्यवरांकडून महाराज्यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आल व मान्यवरांकडून मनोगत व्यक्त करण्यात आले.
आस्था रोटी बँक खरोखर सामाजिक उपक्रम राबवत असते. जगाने स्विकारलेल्या शिवाजी द मॕनेजमेंट गुरु हयांच्या आदर्श ठेऊन भविष्यातील मोहिमेवर फत्ते करण्यासाठी प्रेरणा देण्यात आली. तदनंतर मुलांना खाऊ व शालेय साहित्य वाटप करण्यात आले. मुलांनीही विविध प्रकारच्या ऐतिहासिक पोषाख परिधान करुन उपस्थित होते.
मोफत डोळे तपासणी शिबिर व मोतीबिंदू ऑपरेशन मोफत या कार्यक्रमांमध्ये प्रथमता श्री छत्रपती शिवाजी महाराज चे प्रतिमा चे पूजन करण्यात आले त्यावेळी बसवराज हनुमंत पाटील यांच्या हस्ते महाराजांचे पूजन करण्यात आले. एकूण 190 लोकांना तपासणी करण्यात आले तर मोतीबिंदूचे 63 ऑपरेशन करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे नियोजन आस्थाचे सर्वेसर्वा विजय छंचुरे, निलिमा हिरेमठ, कांचन हिरेमठ, छाया गंगणे, निता आक्रुडे, अविनाश माचरला, लक्ष्मीबाई पुजारी, जिल्हा परिषद रिटार्यड अगंणवाडी परिवेक्षका सुमित्रा चराटे ज्या सध्या पतंजली योग शिक्षिका म्हणून कार्यरत आहे व तसेच नविन सभास लक्ष्मी कुलकर्णी यांनी सहकार्य केल. सूत्रसंचालन छाया गंगणे केले तर आभार प्रदर्शन नीलिमा हिरेमठ यांनी केले.