एन बी नवले सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये शिवजयंती साजरी

2 Min Read

सोलापूर : प्रतिनिधी

केगाव येथील एन बी सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात आज बुधवारी (ता. 19) शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी शिवछत्रपतींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळेस प्राचार्य डाॅ. शंकर नवले, उपप्राचार्य डाॅ.रविंद्र व्यवहारे, प्रा. शरद नवले, प्रा. सचिन घाडगे, ग्रंथपाल जी.एच.घोगले, व्ही.एस.बाबर, किशोर टाकळे, सचिन भानवसे व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.

यावेळेस विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व विचार व्यक्त केले. मेकॅनिकल विभागातील प्रथम वर्षातील विद्यार्थी आदित्य नागणे यांनी छत्रपती शिवरायांवर सुंदर कविता सादर केली. इएनटीसी द्वितीय वर्षातील गौरव शिंदे, उदयनराजे भोसले, प्रणोती रणदिवे, इलेक्ट्रीकल विभागातील स्नेहा काळे, सिव्हिल विभागातील अंजली पवार, सीएसई विभागातील अनिकेत गुंड यांनी शिवरायांवर भाषणातून आपले विचार मांडले.

प्राचार्य डॉ. शंकर नवले यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवरायांची महती उदाहरणांसह पटवून दिली. डॉ . नवले म्हणाले की, शिवाजी महाराजांनी समता व बंधुत्वाच्या मुल्यांवर स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. समाजातील अन्याय, अत्याचार, दडपशाहीचा त्यांनी बीमोड करुन प्रजेचे हित हेच अंतिम ध्येय समजून राज्यकारभार केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या कल्याणासाठी आपले स्वराज्य उभे केले. जात,धर्म,पंथ न मानता त्यांनी सर्वांना न्याय देऊन,समता व बंधुत्व प्रस्थापित केली. परस्त्रीला मातेसमान वागणूक देऊन त्यांनी नेहमीच महिलांचा सन्मान केला. त्यांचे विचार आज दिशादर्शक व प्रेरणादायी असल्याचे सांगत त्यांच्या गुणांचे अनुकरण करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले.

यावेळेस विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक तसेच विविध विभागांतील शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन इलेक्ट्रीकल विभातील विद्यार्थीनी प्रणोती रणदिवे हिने तर आभार प्रदर्शन सिव्हिल विभागातील धैर्यशील साठे केले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!