सोलापूर : प्रतिनिधी
बुधवार 26 फेब्रुवारी, २०२५ रोजी, महाशिवरात्री महापर्वानिमित्त अखंडमहायोगी परमपूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजी काटकर यांच्या दिव्य सानिध्यात श्रीविद्या अखंड महायोग परंपरेतील दीक्षित साधक-साधिका व तसेच सश्रद्द हिंदू, जिज्ञासू, भाविकभक्त यांच्यासाठी पूज्य श्रीगुरुदेव श्री निवासजींचा दर्शनसोहळा, सत्संग व ध्यानशिबीर श्रीविद्याअखंडमहायोग सत्संग सभेच्या वतीने आयोजित करण्यात येत आहे. तसेच महाशिवरात्रीच्या महापर्वावर पूज्य श्री गुरूदेव श्रीनिवासजींकडून उपस्थितांना शिव-शक्ती ध्यान दीक्षा प्राप्त होणार आहे अशी माहिती श्रीविद्याअखंडमहायोगी सत्संग सभेच्या वतीने देण्यात आली.
सदरहू महाशिवरात्रीचा कार्यक्रम सोलापूरातील अक्कलकोट रोडवरील एम आय डी सी पोलीस स्टेशन समोरील पद्मावती कनवेंशन हॉल येथे सांयकाळी ६ ते ९ यावेळेत आयोजित केला आहे. सनातन हिंदूंची अशी श्रद्धा आहे की, महाशिवरात्री महापर्व हे भाविकभक्त आणि आध्यात्मिक जीवन जगू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी खूप महत्वाचे असते. अशा महापर्वावर आदिगुरू भगवान शंकर आपले कृपासामर्थ्य पृथ्वीवर वास करणाऱ्या कल्याणेच्छुक व्यक्तींना, साधकांना प्रदान करत असतात. ही भगवान शंकराची कृपा प्राप्त व्हावी या हेतूने श्रीविद्याअखंडमहायोग परंपरेचे विद्यमान आचार्य व महायोगी पूज्यश्री श्रीगुरुदेव श्रीनिवासजींचे दर्शन, सत्संग व शिवशक्ती ध्यान दीक्षा हा आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित केला जात आहे. सत्संग व ध्यानशिबिराचा हा कार्यक्रम सश्रद्ध, भाविकभक्त व तसेच आध्यत्मिक जिज्ञासू असणाऱ्या सर्व महिला व पुरुष मंडळींसाठी खुला आहे अशी माहिती श्रीविद्याअखंडमहायोग सत्संग सभेच्या पदाधिकाऱ्यांनी मीडिया प्रतिनिधींशी बोलताना दिली.