सोलापूर : प्रतिनिधी (मुंबई)
मुंबई -दादर येथील काँग्रेस चे मुख्य कार्यालय टिळक भवनात आज महाराष्ट्रातील सकल लिंगायत समाजच्या वतीने नूतन प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची निवड झाल्याबद्दल राष्ट्रीय लिंगायत महामंच चे अध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांनी महात्मा बसवेश्वर यांचे पुस्तकं देऊन सत्कार करण्यात केले. पुढील कार्यास शुभेच्छा दिले.
शासनाकडे प्रलंबित असणारे मंगळवेढा येथील जगदज्योती महात्मा बसवेश्वर स्मारक, लिंगायत स्वतंत्र धर्म मान्यता, अल्पसंख्यांक दर्जा, लिंगायत आरक्षण व महामंडळाकडून सरसकट समाजातील युवकांना शिक्षणासाठी, उद्योगासाठी कर्ज मिळावे असे विविध मागण्या चे निवेदन देण्यात आले.
यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले लिंगायत समाजाच्या प्रश्न मार्गी लागण्याकरिता काँग्रेस पार्टी आवाज उठणार आहे. काँग्रेस पक्ष नेहमी लिंगायत समाजाच्या पाठीशी उभी राहिली आहे. या पुढे उभा राहणार आहे अशी ग्वाही दिली.
यावेळी लिंगायत समाजाचे जेष्ठ नेते,माजी आमदार राहुल बोन्द्रे (बुलढाणा), प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी, बसवराज प्याटी (नवी मुंबई), तुकाराम माळी (सांगली), गौरीशंकर मुळे (धाराशिव), संगमेश्वर चौगुले (सोलापूर) आदी उपस्थित होते.