सोलापूर : प्रतिनिधी
राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या बद्दल गलिच्छ वक्तव्य करून जेम्स लेण्याच्या विकृत लेखनाचे समर्थन करणाऱ्या प्रशांत कोरडकर याच्या प्रतिमेला संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर जोडेमार आंदोलन करण्यात आले.
सोशल मीडियावरील क्लिपची चौकशी करून गुन्हा दाखल करून इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना तात्काळ पोलीस संरक्षण देण्याची मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोलापूरचे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे व ईमेलद्वारे करण्यात आली.
विविध माध्यमांचा वापर करून समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न वारंवार होत असतो अशा प्रयत्नातून इतिहासाची प्रचंड तोडफोड केली जाते आणि चुकीचा इतिहास लोकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न होत असतो इतिहास अशा प्रयत्नामुळे कधीही बदलत नाही आणि खरा इतिहासच लोकांच्या समोर आणण्याचे काम इतिहास तज्ञ करीत असतात. कोल्हापुरातील इतिहास तज्ञ इंद्रजीत सावंत यांनी ऐतिहासिक दाखल्यावरून केलेल्या काही वक्तव्यावरून नाराज झालेल्या एका व्यक्तीने त्यांना फोन करून प्रचंड शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिली आहे. सदर व्यक्तीने आपल्या नावाच्या आणि जातीचा हि उल्लेख करत सदर धमकी देताना केलेला असणे अत्यंत अशोबनीय आणि निंदनीय आहे. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहात आणि या राज्यातील सर्व जाती धर्माच्या लोकांचे प्रमुख आहेत सदर व्यक्तीने दिलेल्या धमकी बद्दल पुढील कारवाई तर होईलच तथापि मुख्यमंत्री म्हणून आपल्या नावाचा स्पष्ट समावेश असल्याने सदर प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी बाजू मांडणे अत्यंत आवश्यक असून याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी खुलासा करणे आणि इतिहास तज्ञ इंद्रजीत सावंत यांना योग्य ती सुरक्षा पुरवणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा धमकी देणाऱ्याला मुख्यमंत्री यांनी पाठीशी घातल्या सारखे होईल आणि यापुढे आपल्या नावाचा कोणीही गैरवापर करेल तरी आपण त्वरित खुलासा व योग्य ती कारवाई करावी ही मागणी संभाजी ब्रिगेडचे वतीने करण्यात आली आहे.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शाम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, शहराध्यक्ष शिरीष जगदाळे, कार्याध्यक्ष अरविंद शेळके, संपर्कप्रमुख छत्रगुण माने, दक्षिण तालुका अध्यक्ष शेखर चौगुले, संभाजी ब्रिगेड वकील आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश कदम, रमेश भंडारे, संदीप सरोदे, शेखर कंटीकर, प्रदीप सरवदे, संतोष जत्ती, प्रशांत देशमुख, सिद्धार्थ राजगुरू, सतीश वावरे, रमेश चव्हाण, अकबर मुल्ला, आकाश नाईकवाडी आदी उपस्थित होते.